एसडिपिआयचे क्रांती चौकात तीव्र आंदोलन...

 0
एसडिपिआयचे क्रांती चौकात तीव्र आंदोलन...

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची SDPI ची मागणी

छ.संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज)-

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) च्या वतीने दुपारी 3 वाजता क्रांती चौक येथे जोरदार आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान SIR प्रक्रियेत मतदारांची नावे वगळण्याबाबत निर्माण झालेले प्रश्न, मतदार नोंदणी प्रक्रियेतील बदल, Form-6 संदर्भातील वाद तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.

लोकशाहीमध्ये प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहणे अत्यंत आवश्यक आहे. मतदार यादीतून पात्र नागरिकाचे नाव चुकीच्या पद्धतीने वगळले जाऊ नये आणि मतदार यादी तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि संविधानिक पद्धतीने राबवली जावी, अशी मागणी SDPIच्या वतीने करण्यात आली.

आंदोलनादरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

कार्यकर्त्यांनी “मतदाराचा अधिकार सुरक्षित करा”, “निष्पक्ष निवडणूक—मजबूत लोकशाही”, “संविधान वाचवा—लोकशाही वाचवा” अशा घोषणा देत आपला निषेध व्यक्त केला.

या आंदोलनाला जिल्हा अध्यक्ष समीर शाह, जिल्हा महासचिव मोहसिन खान, जिल्हा समिती सदस्य उमर मिर्झा, मुबश्शिर फारुकी, हाफिज अबुजर पटेल (पूर्व विधानसभा अध्यक्ष), समीर पटेल (सचिव, फुलंबरी विधानसभा), रियाज सौदागर, आरिफ देशमुख, शफीउद्दीन शेख, मुबारक चौस यांच्यासह SDPIचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SDPIने स्पष्ट केले की, मतदारांचा मतदानाचा अधिकार, संविधानिक मूल्ये आणि लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकता यासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष सुरूच राहील.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow