चारा उत्पादन व साठ्याबाबत संयुक्त उपाययोजना राबवा - जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.
जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी बैठक...
चारा उत्पादन व साठ्याबाबत संयुक्त
उपाययोजना राबवा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.7(डि-24 न्यूज)- दुष्काळी पार्श्वभुमिवर जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध असल्याबाबत व चारा उत्पादन, साठवणूक यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभागाने संयुक्तपणे उपाययोजना राबवाव्या,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिले.
जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीची सभा आज पार पडली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम, सहा. आयुक्त डॉ. रमण इंगळे तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात दुष्काळी पार्श्वभुमिवर पशुधनाची काळजी घेणे आवश्यक आहे. अशा कालावधीत जनावरांची वाहतुक मोठ्याप्रमाणावर होण्याची शक्यता असते. ही वाहतुक करतांना जनावरांचे टॅगिंग असणे आवश्यक आहे. त्यावर परिवहन विभागाने काटेकोर लक्ष द्यावे. जनावरांची वाहतुक ही निर्दयतेने होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध करावा. त्यासाठी चारा उत्पादन करणे, चाऱ्याची साठवणूक करणे, मुरघास प्रकल्पांना चालना देऊन चारा साठी उपलब्धतेबाबत खातरजमा करणे यासाठी कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्तपणे उपाययोजना राबवाव्या,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.
What's Your Reaction?