सिल्लोड शहरात सकल मुस्लिम समाजाने काढला विराट मोर्चा....हजारोंचा जनसमुदाय

 0
सिल्लोड शहरात सकल मुस्लिम समाजाने काढला विराट मोर्चा....हजारोंचा जनसमुदाय

सिल्लोड शहरात सकल मुस्लिम समाजाने काढला विराट मोर्चा....हजारोंचा जनसमुदाय

सिल्लोड,दि.27(डि-24 न्यूज) सिल्लोड शहरात तहसील कार्यालयावर सकल मुस्लिम समाज व अल्पसंख्याक संघर्ष समिती सिल्लोड-सोयगावच्या वतीने विराट आक्रोश मोर्चा रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांच्या अटकेच्या मागणीसाठी काढण्यात आला. शांततेत हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मोर्चात हजारोंच्या संख्येने हातात पोस्टर घेऊन कार्यवाहीची मागणी करण्यासाठी सभास्थळी दाखल झाला. यावेळी मुस्लिम धर्मगुरुंनी मार्गदर्शन केले. तहसीलदार यांना मागणीचे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे रामगिरी महाराजांवर भादवी कलम 505, 193, 153-A, 295-A नुसार गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करावी. विशालगड प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी. दोन समाजात द्वेष निर्माण करणा-यांना कठोर शिक्षा होईल असा कायदा बनवावा. मुस्लिम समाजाचे धार्मिक स्थळाचे संरक्षण करावे. वक्फ बोर्ड संशोधन बील हा अवकाफ विरोधी आहे हा कायदा रद्द करण्यात यावा. रामगिरी महाराजांचे समर्थन करणारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे तात्काळ राजीनामा घ्यावा. मुस्लिम तरुणांना बिनव्याजी कर्ज देण्यास बँकांना आदेश द्यावेत. शहर पोलिस हवालदार रामचंद्र बुधवंत यांना निलंबित करावे. सच्चर समितीची अंमलबजावणी करण्यात यावी. बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा द्यावी. दोन धर्मात तेढ निर्माण करणा-यांना कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून ते असे वक्तव्य करणार नाही. आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे आणि संविधान सर्वोपरी आहे हे दाखवण्याची जवाबदारी घटनात्मक उच्च पदावर आसनस्थ आपली आहे. अशी मागणी राज्यपाल यांना तहसीलदार मार्फत राज्यपालांना करण्यात आली आहे

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow