जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार...!

 0
जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार...!

जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार...!

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.16(डि-24 न्यूज) प्रेषित मोहंमद पैगंबर व इस्लाम विरोधी कथित वक्तव्य करणाऱ्या रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावे यासाठी जवाहरनगर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक यांना समाजसेवक मोहम्मद हिशाम उस्मानी यांच्या नेतृत्वाखाली लेखी तक्रार देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते. रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांच्या विरोधात कलम 192, 196, 299, 302, 352 भारतीय न्याय संहिता अन्वय गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महाराजांच्या या वक्तव्याने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कोट्यवधी मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन कडक शासन करावे अशी मागणी लेखी तक्रारमध्ये करण्यात आली आहे. यावेळी मोहम्मद हिशाम उस्मानी, मौलाना शेख हुसेन, राजू पठाण, सलमान नवाब पटेल व शेकडो लोकांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow