तो व्हिडिओ वैजापूरचा नाही, निवेदनावर कायदेशीर कारवाई पोलिस करत आहे अफवांवर विश्वास ठेऊ नका...!
 
                                सोशल मीडियावर अफवा पसरवू नका, त्या व्हिडिओवर चौकशी सुरू आहे, पोलिस कारवाई करत आहे, तो व्हिडिओ वैजापूरचा नाही...या प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....!
छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि आज सरला बेट येथील महंत रामगिरी महाराज यांचा मोहम्मद पैगंबरांविषयी बोलतानाचा विडिओ सोशिअल मीडिया वर व्हायरल होत आहे तरी सदरचा विडिओ हा छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) जिल्ह्यातील नसून इतर ठिकाणाचा आहे तरी त्या बाबत मुस्लिम समाजाकडून प्राप्त निवेदनावरून पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत. तरी सदरचा व्हिडिओ कोणीही समाजमाध्यमांवर प्रसारित करू नये तसेच त्याबाबत अफवा पसरू नये ज्यांच्याकडे हा विडिओ आहे त्यांनी तो तात्काळ डिलिट करावा सदर विडिओ जो प्रसारित करेल त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तरी नागरिकांनी कोणत्याही अफवा पसरू नये अफवांवर विश्वास ठेऊ नये असे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे
 
.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            