आदिवासी पदभरतीसाठी एआयएसएफचा मोर्चा...

आदिवासी पदभरती साठी एआयएसएफचा मोर्चा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 15(डि-24 न्यूज) आदिवासी अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सर्व रिक्त जागा त्वरित भरा या व इतर अनेक मागण्यांसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (ए.आय.एस.एफ.) तर्फे क्रांती चौक येथून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला. शिस्तीत आणि भर पावसात रस्त्याच्या एका बाजूने कोणालाही त्रास न देता काढलेल्या या मोर्चाचे शहराने कौतुक केले.
याबाबत असे की , आदिवासी विद्यार्थ्यांची 12520 रखडलेली पदभरती व इतर विभागातील रिक्त पदांची भरती 45 दिवसाच्या आत करण्यात यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही जाहीर होतील आणि आचारसंहिता लागेल त्यामुळे आचारसंहितेपूर्वी या सर्व पदभरतीच्या जाहिराती काढल्या जाव्यात या मुख्य मागणीसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन ने हा मोर्चा काढला होता.
21 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयनुसार अनुसूचित जमातीची बळकावलेली पदे 31 डिसेंबर 2019 पर्यंत रिकामी करून भरायची होती परंतु शासनाने गेल्या सहा वर्षात केवळ 7810 पदे रिकामी केली आणि यापैकी फक्त 1343 पदे भरण्यात आली,
अद्यापही आदिवासी विद्यार्थ्यांची 11227 पदे रिक्त आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 8928/2015८ व इतर याचीका मध्ये सहा जुलै 2017 रोजी निर्णय दिला या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड पिठात रिट याचिका क्र 3140/2018 या प्रकरणात राज्यात शासकीय व निमशासकीय सेवेत आदिवासींसाठी राखीव असलेले तब्बल 12520 पदे गैर आदिवासींनी खोटी जात प्रमाणपत्र सादर करून बळकवलेली असल्याचे प्रतिज्ञापत्र खुद्द राज्य शासनाने दिले होते तरी देखील अद्याप 11227 पदे न भरल्याचे दिसत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या क्षत्रिय कार्यालयात अनुसूचित जमातीचे गट अ ते गट ड या संवर्गातील 1541 रिक्त पद 45 दिवसाच्या आत मध्ये भरण्यात यावी.
महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेले तब्बल 29 पदे गायब केली असल्याची धक्कादायक माहिती, माहितीतिच्या अधिकारातून समोर आली,
यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे 29 पदे 45 दिवसाच्या आत मध्ये भरण्यात यावी.
आदिवासी विकास विभाग क्षत्रिय कार्यालयात जून 2024 अखेर 4440 पदे रिक्त आहेत. आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर येथे क्षत्रिय कार्यालयासह एकूण 30 आदिवासी प्रकल्प कार्यरत आहेत या क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकूण 15 हजार 359 पदे मंजूर आहेत,
त्यापैकी मंजूर गट अ ची 211 गट ब 332 गट क 11771 गट ड 2045 भरलेली पदे गट 132 गट ब 145 गट क 7468 गट ड 1913 रिक्त पदे गट अ 80 गट ब 187 गट क 4041 गट ड 132 असे एकूण 4440 पदे रिक्त आहेत,
14 डिसेंबर 2022 रोजी शासन निर्णय असून गट क गट ड पदे अडीच वर्षे झाली भरण्यात आली नाहीत.
वरील सर्व रिक्त पदांची भरती 45 दिवसाच्या आत मध्ये पूर्ण करण्यात यावी. या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत पाठवण्यात आले. सकाळी 10.30 वाजता क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय हा मोर्चा काढण्यात आला. या या मोर्चात पर्यंत बिरसा मुंडा जिंदाबाद तंट्या मामा जिंदाबाद नोकरी आमच्या हक्काची पदभरती तत्काळ झालीच पाहिजे पडेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा विजय असो क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो इत्यादी घोषणांनी क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत शहर दणाणले. निवेदन अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांनी स्वीकारले व राज्य शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.
ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे राज्याध्यक्ष कॉ. वैभव चोपकर, राज्य उपाध्यक्ष कॉ. प्रसाद गोरे, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे माजी राष्ट्रीय महासचिव ऍड. कॉ. अभय टाकसाळ, शहराध्यक्ष कॉ. मधुकर गायकवाड, शहर उपाध्यक्ष कॉ. विशाल बोराडे, शहर सचिव कॉ. अनंता कऱ्हाळे, सहसचिव कॉ. उमेश इंगळे , कॉ.यादव भडंगे, आनंदा कोठुळे, रूपाली पोटे, जयश्री मिराशे, नितीन मेंढे, गणेश इंगळे, कैलास काळे, राजू टारफे, पल्लवी ढोले आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या मोर्चात उपस्थित होते.
What's Your Reaction?






