दौलताबाद आणि शहरात शांतता, दिवसभरात काय घडल्या महत्वाचे घटना...!
 
                                शहरात पकडली कुर्बानीची जनावरे, एमआयएम अक्रामक, इम्तियाज जलील भडकले...!
जीन्सी पोलिस ठाण्यात एमआयएमचा जमाव, पैसे घेऊन जनावरे सोडली असल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप... पोलीस उपायुक्त नवनीत काॅवत यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला, जनतेला केले शांततेचे आवाहन...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.17(डि-24 न्यूज) टिप देऊन कुर्बानीची जनावरे पकडण्याची कार्यवाही सकाळी सहा वाजल्यापासून पोलिस आणि सुरू केल्यानंतर खळबळ उडाली. गोवंश कायदा लागू असताना बाजारात विक्रीसाठी कशाला जनावरे आणली जातात. ज्यांनी जनावरे खरेदी केली त्यांच्याकडे जनावरे खरेदीचा दाखला असताना हि कारवाई करण्यात आली. ज्यांचे जनावरे आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली तर सिटीचौक पोलीसांनी तर पैसे घेऊन जनावरे सोडली. जिन्सीच्या हद्दीत सुरू अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिस निरीक्षक लक्ष देत नाही. सरकारने गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी विक्रीवरच बंदी आणावी. आम्हाला गाईचा आदर आहे हिंदू धर्मात गाईचे पावित्र्य आहे. आम्ही आदर करतो परंतु पोलिसांकडून जाणूनबुजून अडवणूक केली जात असल्याचा आरोप करत जीन्सी पोलिस ठाण्यात एमआयएमचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले यावेळी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी पोलीस निरीक्षकांवरच भडकले. कायद्याचा दुरुपयोग करु नका. शहरात सुरू अवैध धंद्यांवर आळा घालावा अशी मागणी पोलिस उपायुक्त नवनीत काॅवत यांच्याकडे केली. यावेळी एसिपि स्वामी, सहायक पोलिस आयुक्त पाटील, जीन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे उपस्थित होते.
दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत एमआयएमचे शेकडो कार्यकर्त्यांनी जीन्सी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. पोलीस उपायुक्त नवनीत काॅवत यांनी आश्वासन दिले की कोणावर अन्याय होणार नाही. प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. कोणाचे काही तक्रारी असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा. ईद निमित्ताने शांततेत सण साजरा करावा कायदा हातात घेऊ नये. कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही असले कृत्य करु नये अशी माहिती यावेळी त्यांनी माध्यमांना दिली.
यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, एमआयएमचे नेते नासेर सिद्दीकी व माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
दौलताबादेत राडा... तरुणाचे दोन गट आमनेसामने
जमावाने एक दुचाकी जाळली, दोन गाड्याचे केले नुकसान... पोलीसांनी वेळीच धाव घेत आणली परिस्थिती नियंत्रणात आणल्याने तणाव निवळला ...
दौलताबाद, ऐन ईद उल अजहाच्या दिवशी सामाजिक एकोप्याला गालबोट लागले. गोवंशाची कत्तल करणाऱ्याची टिप पोलीसांना दिली, या संशयातून एका समाजातील तरुणांच्या टोळक्याने दुसऱ्या समाजातील 4 ते 5 युवकांना मारहाण केल्याची घटना आज रोजी सकाळी 9 ते 10 वाजेदरम्यान दौलताबाद येथे घडली. संतप्त जमावाने यावेळी तीन दुचाकींचे नुकसान केले. यातील एक दुचाकी जाळून टाकली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत, जमावाशी संवाद साधत त्यांना शांत केले.
गोमांस संदर्भात पोलीसांना माहिती दिली म्हणून काही जणांनी 4 ते 5 तरुणांना मारहाण केली. या घटनेनंतर जमावाने एक मोटारसायकल जाळली, तर दोन दुचाकींचे नुकसान केले. पोलीसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली, जखमी युवकांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही गटांच्या तक्रारींवरून दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे अशी माहिती डि-24 न्यूजला पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली आहे.
दौलताबाद मारहाणीच्या घटनेनंतर भाजपाचे प्रदेश महामंत्री संजय केनेकर यांनी पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांची भेट घेत घटनेचा निषेध केला. मारहाण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी ताबडतोब खबरदारी घेत अनर्थ टळला म्हणून पोलिस प्रशासनाचे आभार
 
मानले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            