अतिक्रमण काढताना मनमानी, आयुक्तांवर आ.प्रशांत बंब यांचे गंभीर आरोप...

भुसंपादन न करता चालत आहे बुलडोझर, मनपा आयुक्तांवर प्रशांत बंब यांचे गंभीर आरोप....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) -
सत्ताधारी भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत छत्रपती संभाजीनगर आयुक्तांवर गंभीर आरोप करत शहरात अतिक्रमण काढताना मनमानी व दादागिरी करत असल्याचा गंभीर आरोप केले आहे. 20 वर्षापूर्वी 30 मीटर रस्ता मंजूर असताना डिपी प्लॅन मध्ये 45 मीटर दाखवून गरीबांची घरे पाडली जात आहे. बाॅडी नसताना मनमानी करत आपल्या बंगल्यावर अवाढव्य खर्च करत आहे. मनपाच्या तिजोरीत खडखडाट पण आयुक्तांच्या बंगल्यावर कुठलाही टेंडर न काढता 14.50 लाखांची घरगुती वस्तूंची खरेदी केली. शहर विकास आराखड्यात सुध्दा मनमानी करण्यात आली छोट्या ठिकाणी मोठे आरक्षण टाकण्यात आले. डिपी प्लॅन करताना भुमापन विभागाकडून ईपिओ व ईएलओ महानगरपालिकेच्या नकाशावर अपलोड करावा लागतो त्यानंतर सजेशन ऑब्जेक्शन मागवले जातात हे सर्व बेकायदेशीरपणे शहर विकास आराखडा भुमापन विभागाला विश्वासात न घेता नागरीकांचे आक्षेपांवर निर्णय न घेता मंजूर करण्यात आला. एक खून झाल्यानंतर आयुक्तांनी करप्शनसाठी याचा फायदा घेत अतिक्रमण कार्यवाही सुरु केली. लोक न्यायालयात गेले न्यायालयाने असे म्हटले नाही थेट पाडापाडी करा. प्रोसेस फालो करायला सांगितले आहे. मालमत्ता रेग्युलराईज करायची बांधकाम परवानगी नसेल तर दंड आकारानीचा नियम आहे. गरज पडल्यास भुसंपादन प्रक्रीया राबवायची आहे. भुसंपादन प्रक्रीया न करता मालमत्ता जेसीबीने मनमानी पध्दतीने काढण्याचे न्यायालयाचे आदेश असे नाहीत प्रोसेस फालो करण्याचे आदेश आहेत. प्रोसेस न करता दादा सारखे 50 जेसीबी घेऊन निघाले. सरकारी जमीनीवर अतिक्रमण असेल तर ते काढायलाच हवे. याला माझा विरोध नाही परंतु माझी 60 फुटांची मालकिची जागा आहे बांधकाम परवानगी नाही तर रेग्युलराईज करण्यासाठी नोटीस दिली जाते किंवा दंड आकारला जातो. भुसंपादन करायचे असेल तर प्रक्रीया केली जाते असे न करता मनमानी पध्दतीने अतिक्रमणे काढली जात आहे. असा गंभीर आरोप विधानसभेत आमदार प्रशांत बंब यांनी केल्याने अतिक्रमण कार्यवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आयुक्त व काही अधिका-यांची समीतीकडून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सोमवारी विधानसभेत भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहे. आयुक्त यांच्यासह पाच अधिका-यांची आयएएस अधिकारी व 5 आमदारांच्या समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून मिळणा-या कोट्यावधी रुपयांच्या निधीचे ऑडीट करण्यात आले नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, रवींद्र जोगदंड, अविनाश देशमुख, एम.काझी यांची चौकशी करण्याची मागणी बंब यांनी केली आहे. आयुक्त जी.श्रीकांत यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होवू शकला नाही.
What's Your Reaction?






