शहरातील पाण्याच्या पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा मनसेचा आरोप, मनपा प्रशासकांना दिले निवेदन

 0
शहरातील पाण्याच्या पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा मनसेचा आरोप, मनपा प्रशासकांना दिले निवेदन

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या सुरू असलेल्या भोंगळ कारभारा बाबत मनपाच्या प्रशासकांना मनसेचे निवेदन...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.2(डि-24 न्यूज) महाराष्ट्र जिवन प्राधिकरणचे नविन पाईप लाईनचे काम सध्या शहराच्या विविध भागात चालू असून आता पावसाचे दिवस सुरू आहेत. ऐन पावसाळ्यात ही कामे चालू असून एन-2 सिडको भागात वार्ड क्रमांक ८१ मधील एस. टी. कॉलनी, विनय कॉलनी, महाजन कॉलनी, विवेक हौसिंग सोसायटी, ठाकरे नगर, संत तुकोबा नगर, अशा असंख्य भागात काम सुरू आहेत. सध्या नविन रस्त्यांचे काँक्रिट पोकलॅन्डच्या ब्रेकराने फोडून, खोदकाम करून नंतर जे. सी. बी. ने काहीही मोजमाप न घेता खोदकामाची दुर्बीण द्वारे लेवल न घेता, अंधाधुंद ४ ते ५ फूट रोड खोदण्यात येत आहे. कोणीही प्रशासनाचा जिम्मेदार अधिकारी कर्मचारी हजर राहत नाही. दुसऱ्या राज्यातील कॉन्ट्रॅक्टरची माणसे आपल्या हिशोबाने मार्किंग करून काम करतात. काही विचारले असता ते कामगार त्यांच्या भोजपुरी भाषेत बोलतात ते काय बोलतात हे आपल्याला समजत नाही. आणि आपण काही बोललो तर त्यांना मराठी भाषा कळत नाही अस दाखवितात. कॉन्ट्रॅक्टरने काम देखरेखीसाठी ठेवलेली मराठी माणसांची मराठी भाषा समजते आणि आपण मराठी व हिंदी भाषा बोललो ती संमजत नसल्याचा आव आणतात. देखरेखीसाठी नियमाने संबंधित G.V.P.R. ENGG.LTD. कंत्राटी कंपनीचे अभ्यासू कर्मचारी सिव्हिल कामाचा अनुभव असणारे कर्मचारी सतत हजर राहीले पाहिजे ते पण राहत नाही. आणि महाराष्ट्र 

जीवन प्राधिकरणाचे कोणीही कर्मचारी साईट वर कधीही हजर राहिलेले नाही. कामाचा नकाशा सोबत नाही, कंपनीचा बोर्ड असणे गरजेचे आहे ते पण नाही. जवळ कामाची वर्क ऑर्डर पाहिजे नकाशा पाहिजे यातील कोणत्याच नियमांचे पालन होत नाही. याला जिम्मेदार कोण हे प्रशासनाने सांगावे..? यामुळे अनेक ठिकाणी जुनी पाण्याची पाईप लाईन असंख्य ठिकाणी फुटत आहे. तर असंख्य ठिकाणी ड्रेनेज लाईन फुटल्या असून फुटलेल्या जलवाहिन्या व ड्रेनेजच्या मिक्स पाण्यात डायरेक्ट नविन पाईप टाकण्याचा प्रकार चालू आहे. यामुळे हे घाण पाणी नविन पाण्याची पाईप लाईन मध्ये जात आहे. या कडे प्रशासन दुर्लक्ष करीत असून आता तर पावसाचे पाणी या नवीन पाईप लाईन मध्ये जात आहे. पाईप टाकण्याच्या व खोदलेले रस्ते पुन्हा निर्माण करण्याच्या कामात हजारो कोटींचा घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. १५६ घरे आसलेल्या फक्त एका एस. टी.कॉलनीत प्रत्येक गल्ली मधे वेगवेगळी साईजची पाईप टाकण्याचा प्रकार पाहवयास मिळाला. आगोदर एका गल्लीत आठ इंची पाईप, दुसऱ्या गल्लीत सहा इंची पाईप, तर एका गल्लीत चार इंची पाईप लाईन टाकण्यात आली. अजून कहर म्हणजे एका गल्लीत आठ इंची पाईप टाकला पुढे चार घरांसाठी पन्नास फूट पाईप कमी पडला असता त्या आठ इंची पाईप लाईन ला सहा इंची पाईप जोडण्याचा प्रकार पाहवयास मिळाला. 

G.V.P.R. ENGG.LTD. कंत्राटी कंपनीच्या ज्युनियर इंजिनियर यांना विचारले असता त्यांचे म्हणणे आहे आठ इंची पाईप पेक्षा सहा इंची पाईप ने जास्त प्रेशरने पाणी येते. मग चार इंची पाईप ने तर पाच सहा मजल्या पर्यंत पाणी चढेल असा जावई शोध लावला आहे असे वाटते. या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंपनीची कामे संपुर्ण छत्रपती संभाजीनगर शहरात चालु आहे मग यात हजारो कोटीचा घोटाळा होत आहे हे उघड पणे दिसत आहे. याची सखोल चौकशी प्रशासनाने करावी हि मनसे रस्ते, साधन - सुविधा व आस्थापना विभागाची मागणी आहे. खोदलेल्या रस्त्यांवर सगळीकडे चिखल झाला असून परिसरातील नागरीक मोठ्या प्रमाणावर चिखलात घसरून पडली आहे. यात जेष्ठ नागरिक, दुचाकी वाहन चालक व याच परिसरातील अनेक शाळेचे विद्यार्थी जाता येता घसरून पडत आहेत. या बद्दल नवनिर्वाचित 

खासदार, एक राज्य मंत्री, एक आक्रमक विरोधी पक्ष नेता, आणि दोन आमदार व सर्व विरोधी पक्ष का पेटून उठत नाही हे देखील संशयास्पद वाटते. शहरातील नागरिकांचे दुर्दैव म्हणावे जवळपास पंधरा वर्षात आता कुठे १००० ते १५०० कोटींची रस्त्यांची चकाचक कामे केली रस्त्यांची तीच कामे एक दोन वर्षात पुनः महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ने नवीन पाईप लाईन साठी खोदून टाकली हे जनतेचे पैसे खर्च करून तेच रस्ते पुनः पुनः खोदून प्रशासन जनतेच्या पैशांची उधळ पट्टी करीत असून हे महापाप करीत आहे. अलीकडेच प्रशासनाने सांगितले जे कोणी या कामात अडथळा आणतील त्यांना जेल मध्ये टाकू, आता प्रश्न असा पडतो की ऐन पावसाळ्यात काम चालू ठेवून नवीन पाईप लाईन मध्ये घाण पाणी साचलेले असतांनाही कनेक्शन जोडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असलेल्या जिम्मेदार प्रशासन व G.V.P.R. ENGG.LTD. कंत्राटी कंपनीच्या अधिकारी कर्मचारी यांना का जेल होऊ नये ? एकीकडे नागरिकांना जेल मध्ये टाकण्याची भाषा करता आता तुमच काय करायच...? कोट्यावधी रुपयांची रस्ते खोदुन ती कोन व कोणाच्या पैशांनी रस्ते पुनः बनवणार याचा खुलासा प्रशासनाने स्पष्ट करावा. तसेच पाईप लाईन खोदकाम करताना अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन फुटत आहे. फुटलेल्या ड्रेनेज लाईन साठी नागरिकांकडून ती व्यवस्थित करून देण्याची मागणी नागरिकांनी केली असता कॉन्ट्रॅक्टरची माणसे हे काम आमचे नाही, तुम्ही पाईप घेऊन या आम्ही जोडून देतो असे उद्धट भाषेत बोलतात. याच नागरिकाना २ ते ३ हजार रुपये ड्रेनेज च्या पाईप साठी खर्च करावे लागत आहे. नागरिकांची झालेली नुकसान भरपाई मनपा प्रशासन किंवा प्राधिकरण भरून देईल का ? जोडलेले नवीन कनेक्शन काही ठिकाणी लिकेज झाले असून हे लिकेज व्यवस्थित करण्यासाठी पुन्हा कंत्राटदाराने जेसीबीच्या साह्याने माती काढतांना पुन्हा ड्रेनेज लाईन फुटली असुन त्या लिकेज मधून नवीन पाईप लाईन मध्ये घाण पाणी जात आहे. हे काम अर्धवट सोडून पुढे पुढे कंत्राटदाराची माणसे जात असून काही ठिकाणी नवीन पाईप लाईन टाकून कनेक्शन न देताच दाबून टाकले आहे. प्रशासनाने खोदकाम करताना जे ड्रेनेज पाईप लाईन असंख्य ठिकाणी फुटत आहे. हे पाईप नागरिकांनी आणावे की कॉन्ट्रॅक्टर ने आणायचे तसेच रस्त्यावरील अनेक ठिकाणी पेवर ब्लॉक 

फुटले आहे ते कोणी परत बसवून द्यायचे ? याचा खुलासा प्रशासनाने स्पष्ट करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन - सुविधा व आस्थापना विभागाच्या वतीने रस्त्यांवर उतरुन मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल व याची संपुर्ण जबाबदारी प्रशासकांची राहील. सोबत निकृष्ट दर्जाची कामांची छायाचित्रं जोडली आहेत व काही व्हिडिओ प्रशासकांना दाखविली जातील.

                                         

यावेळी सतनामसिंग गुलाटी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मनसे , अशोक पवार पाटील जिल्हा संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना छत्रपती संभाजीनगर, अशोक कराळे पाटील उपजिल्हा संघटक रस्ते आस्थापना, सुरेंद्र वाडेकर शहर उपाध्यक्ष मनसे ,जॉन बोरगे शहर उपाध्यक्ष मनसे,रुपेश शिंदे शहर उपाध्यक्ष मनसे, बाळासाहेब बोजवारे पाटील गंगापूर तालुका सचिव, रवींद्र गायकवाड विभाग अध्यक्ष मनसे,

सतीश नवपुते, मुकेश मालोदे पाटील, शिवाजी करवंदे, विठ्ठल बनकर ग्राम संघटक, राजु बनकर ग्राम संघटक, ताराचंद बैनाडे ग्राम संघटक, ईश्वर गोरे पाटील महाराष्ट्र सैनिक, वैभव थोरे पाटील महाराष्ट्र सैनिक, प्रदीप कापसे पाटील फुलंब्री तालुका सहसचिव, आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow