नाल्यात कचरा टाकू नये, मनपाचे नागरीकांना आवाहन...

नाल्यात कचरा टाकू नये, मनपाचे नागरीकांना आवाहन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) -
शहरातील मान्सून पूर्व नालेसफाईचे काम महापालिकेच्या वतीने 1 एप्रिल ते 30 जून या दोन महीन्याच्या कालावधीत 5 पोकलेन मशिन्स, 10 जेसीबी, 6 टॅक्टर्स व 10 हायवा या मशिनीद्वारे पूर्ण क्षमतेने करण्यात आले आहे. या दरम्यान शहरातील एकुण 116 कि.मी.अंतराचे नाले सफाई करुन साधारणतः 1800 टन नाल्यातील मलबा उचलण्यात आला. सदरील मलबा खामनदी येथे पाथवे बनविण्यासाठी वापरण्यात आलेला आहे.
त्यानंतर ज्या ठिकाणच्या नालेसफाई बाबत काही नागरी तक्रारी असतील जसे की नालेसफाई व्यवस्थित झाली नाही. किंवा नाल्यातील मलबा उचलणे बाकी आहे. त्यावर तात्काळ कार्यवाई करण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारणी साधारणतः 58 तक्रारींचे निवारण देखील करण्यात आले आहे. शहरातील काही नाल्यांमध्ये जसे की औषधी भवन, नारेगाव, चेलीपुरा, औरंगपुरा येथे नागरीकांकडून वारंवार कचरा टाकला जात असल्यामुळे त्या नात्यांची दुबार सफाई करण्यात आली आहे.
अद्यापही नाल्यांमध्ये टाकला जात असून त्यामुळे नाले चोकअप होत आहेत व महानगरपालिकेच्या नालेसफाई कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तरी नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे कचरा घंटागाडीतच टाकावा. नाल्यांमध्ये कचरा टाकू नये जेणेकरुन नाले चोकअप होणार नाहीत व घरामध्ये पाणी शिरणे टाळता येईल असे आवाहन कार्यकारी अभियंता(यांत्रिकी) अमोल कुलकर्णी यांनी केले आहे.
What's Your Reaction?






