एक विद्यार्थी एक वृक्ष उपक्रमाचा शुभारंभ...

“एक विद्यार्थी एक वृक्ष” तथा 'एक पेड माँ के नाम' उपक्रमाचा शुभारंभ
विभागीय आयुक्तांची उपस्थिती, शालेय विद्यार्थ्यांचा उपक्रमात सक्रीय सहभाग
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16 (डि-24 न्यूज) -
वन विभाग, श्री. सरस्वती भुवन शिक्षण संस्था व शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण दहा कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट घेत “एक पेड माँ के नाम" तथा 'एक विद्यार्थी एक वृक्ष' या उपक्रमाचा शुभारंभ विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते झाला. शिक्षकांनी आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला एक झाड लावण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन विभागीय विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी केले.
श्री. सरस्वती भुवन येथे अयोजित कार्यक्रमाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, प्रादेशिक वनसंरक्षक प्रमोदचंद्र लाकरा, विभागीय शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद, भारत वृक्ष क्रांती मिशनचे ए. एस. नाथन, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, विभागीय वन अधिकारी कीर्ती जमदाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी योजना अरुण शिंदे, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड दिनेश वकील, सरचिटणीसडॉ श्रीरंग देशपांडे, शालेय समितीचे अध्यक्ष ज्ञानप्रकाश मोदानी, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. उल्हास शिऊरकर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. विश्वरूप निकुंभ, शारदा मंदिर कन्या प्रशाला मुख्याध्यापिका डॉ. सविता मुळे आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री. पापळकर म्हणाले, छत्रपती संभाजीनगर विभागात "एक विद्यार्थी एक वृक्ष" हा वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांनी एक झाडे लावून त्यांचे संवर्धन करावे. शिक्षकांनी आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला एक झाड लावण्यासाठी प्रोत्साहित करावे. टेकडीवर मुलांनी झाडे लावावीत आणि पाणी घालून वृक्ष संवर्धन करावे. प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासोबतच त्याची देखभाल करण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. स्वामी म्हणाले, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 10 लक्ष विद्यार्थी वृक्ष लागवड या अभियानामध्ये करण्यात येणार आहे. आपल्या विभागीय आयुक्तांनी "एक विद्यार्थी एक वृक्ष" हे अभियान राबविण्याचे ठरविले असून त्यात वृक्ष लागवड कार्यक्रमाचा समावेश केला आहे, प्रत्येक ग्रामपंचायतीत 100 झाडे, प्रत्येक स्मशानभूमीत 25 झाडे लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक विद्यार्थ्यांला रोप देण्यात आले. रोपांची लागवड प्रशालेत तथा आपल्या घराच्या परिसरात, मैदानात जेथे जागा मिळेल त्या ठिकाणी लागवड करून त्याचे आपल्या आईच्या नावाने संगोपन तथा जतन करावे याविषयी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.
यावेळी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली पाटील यांनी केले.
What's Your Reaction?






