हिशाम उस्मानी यांनी आपल्या आईच्या हस्ते केले प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
हिशाम उस्मानी यांनी आपल्या आईच्या हस्ते केले प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
उद्घाटनप्रसंगी सर्व जाती धर्मातील लोक उपस्थित, सर्व रंगाचे झेंडे, उपस्थितांच्या गळ्यात विविध रंगाचे रुमाल, मान्यवरांच्या हस्ते जाहिरनामाचे प्रकाशन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), 8(प्रतिनिधी) आज मिलकाॅर्नर येथे औरंगाबाद मध्यचे लोकप्रिय उमेदवार हिशाम उस्मानी यांनी आपल्या वृद्ध आई डॉ. राणा हैदरी(डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, सेवानिवृत्त विभागप्रमुख, उर्दू विभाग) हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी विविध पक्ष, संघटना व विविध जिती धर्मातील लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
विविध रंगाचे झेंडे, रुमाल आकर्षण ठरले. आरजेडी, आम आदमी पार्टी, रिक्षा युनियन जाहीर पाठिंबा दिला यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आईच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर उस्मानी भावूक झाले म्हणाले माझे भाग्य समजतो आईने प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करुन आशिर्वाद दिले त्याच पध्दतीने मतदारसंघातील मतदार मतदान करुन सेवा करण्याची संधी देतील असा विश्वास करत उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष विजय खंदारे, वंचित बहुजन आघाडीचे माजी शहराध्यक्ष जलिस अहेमद यांनी उमेदवारी मागे घेत आपल्या टिमसह पाठिंबा दिला, आम आदमी पार्टीचे उबेद इनामदार, रिक्षा युनियनचे वसिम शेख व विविध पक्ष संघटनांनी यावेळी पाठींबा दिल्याने हिशाम उस्मानी यांच्या विजयाचा आत्मविश्वास वाढवला.
याप्रसंगी संजय वाघमारे, सय्यद हमीद, सय्यद अथर हुसेनी(सेवानिवृत्त वाल्मी अभियंता), राजेंद्र भालकर, अनिल चव्हाण, श्रीमती चंद्रप्रभा खंदारे, नजीर फारुकी, शेख मोहसीन लकी, नईम उल हक व जेष्ठ नागरिक, महीला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरनामाचे ठळक मुद्दे....
शहराची ऐतिहासिक ओळख कायम ठेवून प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करणार. मतदारसंघातील प्रत्येक वार्डात मोहल्ला क्लिनिक, व्यसनमुक्ती केंद्र उभारुन शहर नशामुक्त करणार. शहराला मुबलक पाणी, स्वच्छ, सुदर शहर, पक्के रस्ते, ऐतिहासिक आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिडांगन, हर्सुल कचरा डेपो व कचरा प्रक्रिया केंद्र शहराच्या बाहेर हलवणार. प्रत्येक वार्डात सार्वजनिक नळ व हैंडपंप सुविधा उपलब्ध करून देणार. औद्योगिक कंपन्यामधून स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. पर्यटनाला चालना देण्यासाठी रोजगार निर्मितीच्या योजना राबवणार. नवनवीन उद्योग, रेल्वे व विमानसेवा कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध करणार. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नावलौकिक मिळवून देण्यासाठी नवीन संकल्पना राबवणार. आरक्षणापासून वंचित असलेल्या समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी जातीनिहाय जनगणना करण्यासाठी प्रयत्न करणार. प्रत्येक वार्डात उच्च दर्जाचे जीम, आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार. आंतरराष्ट्रीय खेळाच्या स्वतंत्र विद्यापिठाला मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. सर्व धर्मातील महापुरुषांच्या विरोधात गरळ ओकणा-यांविरुध्द कडक कायदा बणवण्यासाठी प्रयत्न करणार. दलित, अल्पसंख्याक बहुल वार्डात विशेष निधितून विकासकामे आणि वार्ड गुंठेवारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार. अल्पसंख्याक विकास सुरक्षा हक्क कायदा बानवून लागू करण्यासाठी प्रयत्न करणार. शहर टँकरमुक्त, पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. संतपिठ व महापुरुषांच्या आदर्श जीवनात अभ्यासण्यासाठी विविध धार्मिक शिक्षणाचे कोर्स आणण्यासाठी प्रयत्न करणार. औरंगाबाद शहराचे नाव कायम ठेवण्यासाठी न्यायालयीन व राजकीय लढा
लढणार.
What's Your Reaction?