सांस्कृतिक महोत्सवातून लोककलाकराकारांनीलोकसंस्कृतीचा वारसा जपला - राज्यपाल हरिभाऊ बागडे

 0
सांस्कृतिक महोत्सवातून लोककलाकराकारांनीलोकसंस्कृतीचा वारसा जपला - राज्यपाल हरिभाऊ बागडे

सांस्कृतिक महोत्सवातून लोककलाकारांनी लोकसंस्कृतीचा वारसा जपला _ राज्यपाल हरीभाऊ बागडे

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18 (डि-24 न्यूज) विविध राज्यातील हजारो वर्षांपासून चालत आलेली लोकसंस्कृती विविध लोक महोत्सवांमुळे आजही जिवंत आहे. विविध राज्यांतील लोककलाकारांनी कलाविष्कारातून लोकसंस्कृतीचा वारसा जपला आहे असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. केंद्रीय संस्कृतीक मंत्रालयांतर्गत पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एमआयटी कॉलेजच्या मंथन हॉलमध्ये आयोजित दोन दिवसीय 'वारसा सह्याद्रीचा' कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. आमदार अनुराधा चव्हाण, आमदार अर्जुन खोतकर, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी ,पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूरचे निदेशक फुरकान खान, राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयचे सहसंचालक श्रीराम पांडे , यांची उपस्थिती होती . कार्यक्रमात हरिभाऊ बागडे म्हणाले की ,अशा महोत्सवांमुळेच प्रत्येक राज्याला दुसऱ्या राज्याच्या लोकसंस्कृतीशी, लोककलांशी परिचित होण्याची संधी मिळते. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर यांचे या कार्यातील योगदान कौतुकास्पद आहे, असे सांगितले.

 मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि महाराष्ट्राच्या राज्यगीताने करण्यात आली.

सूत्रसंचालन मोहिता दीक्षित आणि मिलिंद रमेश कुलकर्णी यांनी केले.

विविध राज्यांच्या संस्कृतींनी बहरली महाराष्ट्राची भूमी- राजस्थानच्या खरतालपासून ते महाराष्ट्राच्या तुतारीपर्यंत संगीताच्या लहरी

गुजरातच्या सिद्दी धमाल,बंगालच्या नटुआ, राजस्थानच्या चरी लोकनृत्यांची धूम

                          देशातील विविध राज्यांच्या कला-संस्कृतींच्या अनोख्या संगमाचे साक्षीदार ठरले. केंद्रीय संस्कृती मंत्रालयांतर्गत पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘वारसा सह्याद्रीचा’ कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा हा प्रसंग होता. यात विविध राज्यांच्या लोकवाद्यांच्या अनोख्या प्रस्तुती ‘म्युझिकल सिम्फनी’ने रसिकांना भुरळ घातली, तर सात राज्यांच्या वाद्यांसह लोकनृत्यांनी कला प्रेमींना मंत्रमुग्ध केले. येथे भारूड गायनाने स्थानिक संस्कृतीची झलक दाखवत रसिकांची मने जिंकली.

पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूरचे संचालक फुरकान खान यांनी सांगितले की, देशातील विविध राज्यांच्या संस्कृती महाराष्ट्रातील सर्वसामान्य आणि कला प्रेमींपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या विविध संस्कृतींच्या महासंगमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात सात राज्यांच्या लोकसंस्कृतीचे नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून सुंदर सादरीकरण होत आहे, तसेच कथक बॅलेचा शास्त्रीय रंगही जोडण्यात आला आहे.

 राजस्थानच्या लोकवाद्यांच्या ‘डेझर्ट सिम्फनी’मध्ये खरताल, पुंगी (बीन), चौतारा, कामायचा, सारंगी, मटका, बाजा, ढोलक, मोरचंग यांच्यासह कच्छची वीणा, जोडिया पावा, गमेलू, मंजीरा आणि महाराष्ट्राची नाळ व तुतारी (बिगुल) यांच्या अनोख्या संगीतमय मिश्रणाने श्रोते थक्क झाले. त्यानंतर महाराष्ट्राच्या तुतारीच्या जाहीर गूंजीसह संतोष नायर यांनी दिग्दर्शित केलेल्या कोरिओग्राफी प्रस्तुतीत मराठी गोंधळ, गोव्याचे समई, महाराष्ट्राची लावणी, राजस्थानचे चरी व कालबेलिया, गुजरातचे राठवा आणि सिद्दी धमाल, मणिपूरचे पुंग ढोल चोलम, पश्चिम बंगालचे पुरूलियाचे नटुआ, पंजाबचे भांगडा यांच्या अनोख्या संगमाने हॉलमधील शेकडो प्रेक्षकांनी ‘वाह वाह’चा गजर केला आणि प्रस्तुतीदरम्यान हॉल अनेकदा टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमला.

विविध संस्कृतींची ही सरिता पुन्हा मराठी संस्कृतीकडे वाहत गेली. येथे प्रसिद्ध लोकगायक गणेशचंदन शिवे यांच्या भारूड प्रस्तुतीत रूपकांचा आणि दुहेरी अर्थांचा वापर करून सर्वसामान्यांना नैतिक आणि दार्शनिक संदेश देण्यात आला. यावेळी श्रोत्यांनी अनेकदा टाळ्यांच्या कडकडाटाने एमआयटी परिसर निनादला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow