उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात...

उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) -
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शहराच्या दौ-यावर येत आहे. 5.05 मिनटाने चिकलठाणा विमानतळावर त्यांचे आगमन होईल. 5.40 वाजता मोटारीने पैठण येथील फारोळा जलशुध्दीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी करतील. छत्रपती संभाजीनगर शहर 26 एम.एल.डी.पाणी पुरवठा योजनेचे जलपूजन, कामाची पाहणी व आढावा घेतील. सायंकाळी 6.30 वाजता मोटीरीने प्रयाण. सायंकाळी 7.30 वाजता मंथन हाॅल, एमआयटी काॅलेज परिसर, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर येथे आगमन. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर, राजस्थान व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित "वारसा सह्याद्रीचा" समारोप समारंभाला उपस्थिती.
What's Your Reaction?






