उद्या आमदार संजय केनेकर काढणार कावड यात्रा...

 0
उद्या आमदार संजय केनेकर काढणार कावड यात्रा...

उद्या आमदार संजय केनेकर काढणार कावड यात्रा...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) -

श्रावण हा हिंदू धर्मियांचा सण आणि उत्सवाचा महीना त्यातील श्रावण मासानिमित्त आमदार संजय केनेकर हे उद्या भव्य दिव्य कावड यात्रा आयोजित केली आहे. 

कावड यात्रेची सुरुवात श्री.रामेश्वर महादेव मंदिर जाधववाडी येथून होऊन ते खडकेश्र्वर महादेव मंदीर येथे समाप्त होणार आहे. कावड यात्रेचा शुभारंभ ह.भ.प.महंत श्री रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते होणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत आमदार संजय केनेकर यांनी दिली.

श्रावण मासात सर्व शिवभक्त शिवाची आराधना करताच तोच धागा पकडून आमदार संजय केनेकर यांनी शहरातील सर्व हिंदू संघटनांना एकत्र करुन सदरिल यात्रेचे आयोजन केले आहे. सर्व हिंदू विचारसरणीच्या संघटनांचे 8 ते 10 हजार युवक यात आपला सहभाग नोंदवणार आहेत.

सदरिल कावड यात्रेचा मार्ग श्री रामेश्वर महादेव मंदिर जाधववाडी येथून सुरुवात होऊन ती जिजाऊ चौक, टिव्ही सेंटर, उद्धवराव पाटील चौक, अण्णाभाऊ साठे चौक, शहागंज, सराफा, गुलमंडी, औरंगपुरा मार्गे खडकेश्र्वर महादेव मंदीर येथे दक्षिणची गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरीतील कावडियांनी आणलेले जल अर्पण करुन श्री खडकेश्र्वर महादेवाला अभिषेक करण्यात येईल. कावड यात्रेचा समावेश होईल. कावड यात्रेचे प्रमुख आकर्षण उत्तर प्रदेश येथील अघोरी कलावंतांचा संच, 12 फुटी श्री महादेवाची मूर्ती चार फुटी महादेवाची पिंड, भव्य दिव्य श्री हनुमान मूर्ती असणार आहे. या कावड यात्रेत 20 हजाराहुन अधिक शिवभक्त व तीनशेहुन अधिक स्वयंसेवक असणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत आमदार संजय केनेकर यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow