मनपाच्या वर्धापनदिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन

 0
मनपाच्या वर्धापनदिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन

मनपा वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिरांचे आयोजन

औरंगाबाद,दि.9(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या 41 व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य विभागातर्फे विविध आजारांबाबत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पारस मंडलेचा, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी अर्चना राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व नियंत्रण अधिकारी डॉ उज्वला भांबरे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात 

बन्सीलाल नगर आरोग्य केंद्र येथे लायन्स क्लब द्वारे एकूण 70 रुग्णांची नेत्ररोग तपासणी करण्यात आली.

सिडको एन-8 येथील मनपा रुग्णालय येथे युनायटेड सिग्मा हॉस्पिटल यांच्यातर्फे 72 रुग्णांची स्तन कर्करोग साठी मेमोग्राफी तपासणी करण्यात आली.

 महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये आज 1338 गरोदर मातांची तपासणी करण्यात आली.

अशी माहिती सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ अर्चना राणे यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow