टिईटी परीक्षेचा पेपर फुटी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची एमआयएमची मागणी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...!
TET पेपरफुटी प्रकरणाविरोधात AIMIM विद्यार्थी आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) -महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ AIMIM विद्यार्थी आघाडी यांच्या दुपारी 2.00 ते 4.00 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर शांततापूर्ण धरणे व निदर्शने करण्यात आली. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
हे आंदोलन माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर, शहराध्यक्ष नासेर सिद्दीकी, एमआयएमचे विद्यार्थी आघाडी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कुणाल खरात, शारेक नक्षबंदी, यांच्या नेतृत्वात अंदोलन करण्यात आले.
निवेदनामध्ये TET पेपरफुटी प्रकरणाची पारदर्शक चौकशी, संबंधित सर्व दोषींना तात्काळ अटक, जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेणे, परीक्षा प्रक्रियेत अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था लागू करणे तसेच पेपरफुटी रॅकेटचा संपूर्ण पर्दाफाश करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी मा. खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी सांगितले की, "राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी मिळता कामा नये. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा सन्मान राखण्यासाठी शासनाने तात्काळ कठोर कारवाई करून दोषींना शिक्षा करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा."
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी "TET पेपरफुटीतील दोषींना अटक करा", "विद्यार्थ्यांना न्याय द्या", "परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार बंद करा" अशा घोषणाही देत शासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी पक्षातील नगरसेवक फेरोज खान, शेख अहेमद, मुन्शी पटेल, काकासाहेब काकडे, अकील अहेमद, अमजद खान, फेरोज खान (fk), साबेर पटेल, अशोक हिवराळे, उसामा कदिर मौलाना, मतीन खान, वाजेद जहागीरदार, अमर बिनहैद्रा, अब्दुल्ला बिन हिलाबी, साबेर शेख, अमजद चाचू, मिर वाजीद अली, रहमान आलम खान, अझर पठाण, सुमित जमधडे, वासीम अहेमद, रफिक पालोदकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
.
What's Your Reaction?