शहर पथविक्रेता सदस्य निवडण्यासाठी 25 जूलै रोजी मतदान, महापालिकेत झाली बैठक...!

 0
शहर पथविक्रेता सदस्य निवडण्यासाठी 25 जूलै रोजी मतदान, महापालिकेत झाली बैठक...!

शहरपथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे मनपाचे आवाहन...

महापालिकेच्या वतीने पथ विक्रेता निवडणूक तयारी पूर्ण...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र पथ विक्रेता उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन महाराष्ट्र नियम 2016 अंतर्गत दि.25 जुलै रोजी निवडणूक पार पडणार आहे.

या अनुषंगाने आज उप आयुक्त 02 तथा निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा थेटे यांच्या अध्यक्षतेखाली पथ विक्रेता संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली.

यावेळी एनयूएलएमचे प्रकल्प व्यवस्थापक सुरेंद्र पाटील, भरत मोरे ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकर्स युनियनचे राजू हिवराळे, जन सहारा हॉकर्स संघटनाचे सलीमउद्दीन सिद्दिकी ,संघर्ष कामगार संघटना अहमद जलिस, भारतीय बहुजन कामगार संघ प्रशांत गायकवाड, हॉकर्स जॉइन ॲक्शन कमिटी मुंजाभाऊ भाले आदींची उपस्थिती होती.

या बैठकीत निवडणूक प्रक्रिया कशी पार पडणार आहे ,याची महापालिकेच्या वतीने कशी तयारी करण्यात आली आहे याची माहिती देण्यात आली.

ही निवडणूक प्रक्रिया निःपक्ष पणे व सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिकेच्या वतीने सुष्म नियोजन करण्यात आले आहे. शहरातील स्थानिक वृत्त वाहिनी ,एफ एम रेडिओ ,यावरती जिंगल स्वरूपात जनजागृती ,वर्तमान पत्रातून जनजागृती, रिक्षा द्वारे प्रत्येक प्रभात जनजागृती, तसेच सोशल मिडियावरती पदाधिकारी व संघटनेचे प्रतिनिधी यांचे अपिलीय बाईट या द्वारे माहिती देण्यात येणार आहे.

ही निवडणूक मनपा शाळेच्या 06 मतदान केंद्र व 20 बूथ वरती पार पडणार आहे. यात मनपाच्या भडकल गेट , किराडपुरा, मुकुंदवाडी, प्रियदर्शनी शाळा व सिल्क मिल कॉलनी येथील मनपा शाळा या सहा केंद्रांचा समावेश आहे.

या निवडणुकीसाठी 14098 मतदार असून एकूण 8 पदांसाठी निवडणूक पार पडणार आहे. सदर निवडणूक ही बॅलेट पेपर वरती होणार असून प्रत्येक मतदाराकडे आधार कार्ड व सर्वेक्षण केलेला युनिक आयडी नंबर आवश्यक असणार आहे. यानंतरच ते मतदान करू शकतात.

उपस्थित संघटना प्रतिनिधींनी ही निवडणूक यशस्वी करण्याकरिता वार्डातील नगरसेवक यांची मदत घेण्याची सूचना केली.

निवडणुकी मध्ये उमेदवारासाठी 2000 रु. अनामत रक्कम भरावी लागणार आहे. अशी माहिती सुरेंद्र पाटील यांनी या वेळी दिली.

सदर निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी महापालिकेच्या वतीने करण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow