आंबेडकरी चळवळीतील नेते मिलिंद दाभाडे यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश...
आंबेडकरी चळवळीतील नेते मिलिंद दाभाडे यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) - आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी प्रभाग क्रमांक 20 चे शाखाप्रमुख अनिल थोटे, उपविभाग प्रमुख अरुण काळे, शिवाजी खवणे, व्यापारी आघाडीचे उप शहर प्रमुख कैलास खैरनार, उप शाखाप्रमुख प्रशांत कुलकर्णी, बुथ प्रमुख रमेश जाधव, ज्ञानेश्वर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
What's Your Reaction?