माजी महापौर रशीद खान मामू यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश...
ताजी बातमी, माजी महापौर रशीद खान मामू यांचा शिवसेनेत प्रवेश...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज) - शहराचे मामू म्हणून प्रसिद्ध असलेले जेष्ठ राजकारणी रशीद खान मामू यांनी आज मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना (उबाठात) जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे व पदाधिकारी उपस्थित होते.
एसटी प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या पदावर एकदा मामूंनी महापौर पद मिळवत पहिले मुस्लिम महापौर म्हणून इतिहास रचला होता. 2015 मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत राजनगर-चेतनानगर वार्डातून एसटी आरक्षित वार्डातून निवडणूक लढवली. थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत ते निवडणूक लढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
What's Your Reaction?