उद्या पावसासाठी विशेष नमाजचे इदगाहमध्ये आयोजन, हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
उद्या पावसासाठी विशेष नमाजचे इदगाहमध्ये आयोजन...
हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन...
औरंगाबाद, दि.24(डि-24 न्यूज) मागिल एक ते दिड महिन्यापासून पाऊस पडत नसल्याने बळीराजाचे नजरा आभाळाकडे वळले आहेत. पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. तलाव आटत चालले आहे. पाऊस पडावा यासाठी अल्लाहकडे विशेष दुवा करण्यासाठी औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक छावणी इदगाह मैदानात शुक्रवारी दुपारी तीन वाजता विशेष नमाज( नमाज-ए-इस्तिस्का) चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती धर्मगुरू मुफ्ती नसिमोद्दीन मिफ्ताई यांनी डि-24 न्यूजला दिली आहे. या नमाजसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन इमारत-ए-शरीयाचे अध्यक्ष मुफ्ती मोईज कासमी यांनी केले आहे. मुफ्ती नसिमोद्दीन मिफ्ताई पुढे म्हणाले या विशेष नमाजमध्ये विशेष दुवा अल्लाहकडे क्षमा याचना करुन केली जाईल. महाराष्ट्र तथा मराठवाड्यात पाऊस पडत नसल्याने चिंता वाढली असल्याने विशेष नमाजचे इदगाहमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?