महापालिकेच्या शाळेत डिजिटल क्लासरुम व रोज गार्डनचे उद्घाटन

 0
महापालिकेच्या शाळेत डिजिटल क्लासरुम व रोज गार्डनचे उद्घाटन

मनपा शाळेत डिजिटल क्लासरूम व रोजगार्डन चे उदघाटन...

 

औरंगाबाद, दि.24(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या सिडको एन-7 येथील शाळेत डिजिटल क्लासरूम व रोज गार्डनचे उद्घाटन प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते आज करण्यात आले.

   महानगरपालिकेच्या सर्व शाळेत स्मार्टसिटी तर्फे राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या प्रकल्पा अंतर्गत विविध उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेच्या सर्व शाळा स्मार्ट करण्यात येत असून मनपा सिडको एन-7 शाळेत स्मार्ट सिटी अंतर्गत सर्व 08 वर्ग खोल्या डिजिटल करण्यात आलेल्या आहेत.

 या वर्ग खोल्यांचे व प्रांगणातील रोज गार्डनचे उद्घाटन आज प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशासक यांनी उदघाटन करण्याचा मान शाळेतील बाल संसद मधील बालपंतप्रधान नंदिनी नवगिरे व आयुक्त यांचे प्रतिनिधी रोजी डिसूजा यांना दिला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवं चैतन्य संचारले होते. या कार्यक्रम प्रसंगी प्रशासक यांनी विद्यार्थ्यासोबत संवाद साधला. तसेच शाळेच्या समस्येबाबत बालसंसद मधील सर्व बाल मंत्रिमंडळ आणि आयुक्त यांचे प्रतिनिधी सोबत संवाद साधून शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची जाणीव करून घेतली. यावेळी विद्यार्थिनींनी शाळेत खेळण्यासाठी मोठे मैदान विकसित करण्याबाबत विनंती केली असता आयुक्त यांनी सदर मैदान सर्व खेळ खेळण्यासाठी लवकरच विकसित केले जाईल अशी घोषणा केली. तसेच तुम्ही सर्वांनी दररोज उपस्थित राहावे अभ्यास करावा आणि मोठे मोठे खेळ खेळावेत व यामधून मोठे अधिकारी किंवा वेगवेगळ्या खेळांमध्ये आपली महानगरपालिकेचे नाव उंच करावे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सूचना दिल्या.

 तसेच स्मार्ट गुरु ॲप मुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती 74 टक्के वरून 83 टक्के झाल्यामुळे सर्व मुख्याध्यापक शिक्षकांचे बालतांइचे प्रशासक यांनी अभिनंदन केले आणि उर्वरित विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेत आणण्यासाठी आपण प्रयत्न करावे. तीन दिवस जर विद्यार्थी गैरहजर असेल तर त्याला फोन करावा सात दिवस जर गैरहजर असेल तर त्याच्या घरी जावे अशा पद्धतीने काम करून आपल्याला उपस्थिती वाढवायची, उपस्थिती वाढविल्यानंतर गुणवत्ता वाढणार आहे त्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

 शाळेत तनुजा कैलास रगडे ही अंध विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत उपस्थित राहते. दीव्यांग विद्यार्थ्यासाठी प्रशासकांनी प्रत्येक शाळेत दिव्यांग मित्र ही संकल्पना राबविली आहे त्या विद्यार्थिनी सोबत प्रशासकांनी संवाद साधून तुझी मैत्रीण कोण आहे याची माहिती घेतली आणि त्या विद्यार्थिनीचे स्वागत केले त्या विद्यार्थिनीला व त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना या विद्यार्थिनी सोबत चांगली मैत्री करण्याबाबत विनंती केली आणि मी पुढच्या वेळेस शाळेत आल्यावर या विद्यार्थिनीला विचारेल की तुझी सर्वात बेस्ट फ्रेंड कोण आहे यासाठी सर्वांनी तुम्ही प्रयत्न करावेत असे सूचना केल्या तसेच डिजिटल क्लास रूम मध्ये विद्यार्थ्यांना प्रशासकांनी बोर्ड कसा सुरू करावा, त्याच्यामध्ये अभ्यास कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले तसेच काही विद्यार्थ्यांना पाढे म्हणायला लावले व वाचन करायला लावले.

  या कार्यक्रम प्रसंगी उप आयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख नंदा गायकवाड , गणेश दांडगे नियंत्रण अधिकारी, शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ थोरे ,कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, नरहरी कांबळे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक अहमद पटेल तसेच शालेय व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्य शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दिपाली आवटे या शिक्षिकेने केले तर मुख्याध्यापकांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow