मनपा आयुक्तांना विनोद पाटील यांचा 5 दिवसांचा अल्टिमेटम...

मनपा आयुक्तांना विनोद पाटील यांचा 5 दिवसांचा अल्टीमेटम
बाधितांची यादी प्रसिध्द करु मोबदला द्या, पत्रकार परिषदेत मागणी...
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांच्यासमोर शहरातील पाडापाडीची सर्व परिस्थिती मांडल्यानंतर त्यांनी 'तात्काळ तपासून कार्यवाही करावी', असे आदेश मनपा आयुक्तांना दिले आहेत. असे सांगत, ज्या लोकांची घरे पाडली, त्यांची यादी जाहीर करा, त्या सर्वांना नियमानुसार रोख स्वरुपात मोबदला द्या, आगामी 5 दिवसांत ही कार्यवाही न केल्यास बाधितांना सोबत घेवून मनपा आयुक्तांच्या बंगल्यासमोर ठाण मांडणार आयुक्तांना फिरू देणार नाही, असा इशारा अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
पाटील यांनी मनपा आयुक्तांनी राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रस्ता रुंदीकरणासंदर्भात नागरिकांशी चर्चा केली नाही, नोटिस, पंचनामे, मोबदला आदी कोणतीही कायदेशीर कार्यवाही न करता, आयुक्तांनी थेट शहरातील नागरिकांची बांधकामे अतिक्रमण ठरवून पाडली. नवीन शहर विकास आराखड्यास शासनाची मंजुरी नसतानाही, रस्ता रुंदीकरणाची मोहिम हाती घेतली. दडपशाही करत घरे पाडली. शहरात टीडीआरचे दर वाढत असताना, ते कमी व्हावेत म्हणून काही बिल्डरांच्या फायद्यासाठी आयुक्तांनी कारवाई केली. पडेगाव-मिटमिटा रस्त्याचे घाईघाईने भूमिपूजनासाठी घरे पाडली, असा आरोपही पाटील यांनी केला. पत्रकार परिषदेला शहरातील विविध भागातील बाधित मालमत्ताधारकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
एकीकडे शहर विकास आराखड्यानुसार रस्ते रुंद करण्याची कारवाई महापालिका करत आहे, मात्र बांधकाम परवानगीच्या शेकडो फाईल्स आराखडा मंजूर नसल्याचे कारण देत प्रलंबित ठेवलेल्या आहेत. कांचनवाडी, नक्षत्रवाडीत एक मोठा प्रकल्प येणार आहे, त्यासाठी या रस्त्याच्या रुंदीकरणाची मोहिम हाती घेतली आहे, असा गौप्यस्फोटही पाटील यांनी केला, तर कोणत्या बिल्डरला रस्ता द्यायचा आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नॅशनल हायवेकडून 60 मीटर रुंद रस्त्यासाठीच निधी उपलब्ध करून दिला जातो, त्यामुळे आयुक्तांनी रस्ता रुंद करण्याची भूमिका घेतली आहे. कोणत्या कंत्राटदारांना रस्त्याची कामे देण्याची कमिटमेंट आयुक्तांनी केली आहे., असा प्रश्नही विनोद पाटील यांनी उपस्थित केला.
बाधित लोकांची यादी प्रसिद्ध करून त्यांना रोख मोबदला द्या
मुख्यमंत्र्यांनीही आदेश दिल्याची पाटील यांची माहिती : मनपा आयुक्तांना पाच दिवसांचा अल्टीमेटम
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांच्यासमोर शहरातील पाडापाडीची सर्व परिस्थिती मांडल्यानंतर त्यांनी 'तात्काळ तपासून कार्यवाही करावी', असे आदेश मनपा आयुक्तांना दिले आहेत., असे सांगत, ज्या ज्या लोकांची घरे तोडली, त्यांची यादी जाहीर करा, त्या सर्वांना नियमानुसार रोख स्वरुपात मोबदला द्या, आगामी पाच दिवसांत ही कार्यवाही न केल्यास बाधितांना सोबत घेवून मनपा आयुक्तांच्या बंगल्यासमोर ठाण मांडणार, आयुक्तांना फिरू देणार नाही, असा इशारा अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.
What's Your Reaction?






