हिशाम उस्मानी निवडणुकीनंतर पुन्हा सक्रीय, घेतला रोजगार मेळावा
हिशाम उस्मानी निवडणुकीनंतर पुन्हा सक्रीय, घेतला रोजगार मेळावा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) विधानसभा निवडणुकीत यश मिळाले नसले तरीही नेहमीप्रमाणे समाजसेवक हिशाम उस्मानी हे समाजसेवेत पुन्हा सक्रीय झाले आहे. आज त्यांनी विविध मोबाईल कंपनीत मार्केटींगसाठी 70 जागेसाठी बारावी उत्तीर्ण युवकांसाठी रोजगार मेळावा आयोजित केला. या रोजगार मेळाव्यास युवकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. बेरोजगार युवकांना नोकरीची संधी हिशाम उस्मानी यांनी मिळवून दिल्याने त्या युवकांच्या चेह-यावर हसू फुलले. त्यांनी यावेळी सांगितले शहराच्या विकासाचे व्हिजन घेऊन निवडणुकीत भाग्य आजमावले यश मिळाले नसले तरीही समाजाची सेवेचा संकल्प केला आहे ती सेवा निस्वार्थ भावनेने करत राहणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षात न जाता अशीच समाजसेवा सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी मोबाईल कंपनीचे सय्यद ऐतेशाम, आसिफ ख्वाजा, इरफान खान, मोहम्मद शहेबाज, इरफान चिश्ती, मोबीन शेख आदीं कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?