रोशनगेट-कटकटगेट रस्ता रुंदीकरण मार्कींगवरुन वाद, ज्यांना आक्षेप असेल त्यांनी उद्या सुनावणीत हजर राहावे...!

 0
रोशनगेट-कटकटगेट रस्ता रुंदीकरण मार्कींगवरुन वाद, ज्यांना आक्षेप असेल त्यांनी उद्या सुनावणीत हजर राहावे...!

रोशनगेट-कटकटगेट रस्ता रुंदीकरण मार्किंगवरुन वाद, ज्यांना आक्षेप असेल त्यांनी उद्या सुनावणीत हजर राहावे...!

रस्त्याचे खोदकाम सुरू आहे पाण्याची व ड्रेनिजलाईन व्यवस्थीत करुन रस्त्याचे काम सुरू करायचे असल्याने मार्कींगवरुन पुन्हा वाद विवाद सुरू झाल्याने कामात बाधा निर्माण झाल्याची येथे स्थिती आहे....

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) महानगरपालिका प्रशासनाने रोशनगेट ते कटकट गेट 12 मिटर रस्ता रुंदीकरण करण्यासाठी अतिक्रमणे काढली आहे. स्वखुशीने मालमत्ता धारकांनी मालमत्तेचे अतिक्रमण काढून घेतले परंतु काही मालमत्ता धारकांचा आरोप आहे की काही मालमत्तेचे कमी अधिक प्रमाणात मनपा प्रशासनाने अधिका-यांना हाताशी धरून अतिक्रमण काढले. या रस्त्यावर दोन धार्मिक स्थळ आहे त्याला धक्का लागू नये अशी विनंती येथील नागरिकांनी केली आहे. मार्कींगवर काहींचा आक्षेप आहे ऐनवेळी मार्कींग बदलून काहींची अधिक मालमत्ता बाधित झाल्याने अन्याय झाला यामुळे आज मनपाचे अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे बाधित मालमत्ता धारकांचे तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तेथे पोहोचले यावेळी काही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अतिक्रमण विभागाचा फौजफाटा सोबत पोलिस कर्मचारी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त यांनी मार्किंगवर आक्षेप घेणाऱ्या नागरीकांना आवाहन केले उद्या सकाळी 10 वाजता मनपा आयुक्तांच्या दालनात तक्रारदार मालमत्ताधारकांनी मालमत्तेचे कागदपत्रे घेऊन हजर राहावे. आक्षेपांवर सुनावणी घेतली जाईल रस्त्याचे काम तात्काळ सुरू करायचे आहे. ज्याप्रकारे आतापर्यंत येथील नागरिकांनी रस्ता रुंदीकरण करण्यासाठी सहकार्य केले तसेच सहकार्य करावे, कोणावरही अन्याय होणार नाही असे आवाहन येथील नागरिकांना केले आहे

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow