मत्सोदरी काॅलेजचे 2006 बॅचचे विद्यार्थ्यांचा 20 वर्षांनंतर स्नेहसंमेलन उत्साहात

 0
मत्सोदरी काॅलेजचे 2006 बॅचचे विद्यार्थ्यांचा 20 वर्षांनंतर स्नेहसंमेलन उत्साहात

मत्सोदरी कॉलेज मधील 2006 पदवी बॅच मधील विद्यार्थ्यांचा 20 वर्षानंतर स्नेसंमेलन उत्साहात साजरा..

छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज) मत्सोदरी कॉलेजचे 2006 पदवीचे विद्यार्थी आज मोठ्या संख्येने उपस्थित होते. तब्बल 18 ते 20 वर्षानंतर सर्व विद्यार्थी मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रसाद लॉन बीड बायपास संभाजीनगर(औरंगाबाद) येथे करण्यात आले. सदर कार्यक्रमात सर्व मित्र मैत्रिणी वेगवेगळ्या ठिकाणावरून उपस्थित झाले. सर्व मित्र वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पदावर कार्यरत असल्याने सर्वांना खूप आनंद झाला. सर्व विद्यार्थी आपल्या मेहनतीने कोणी पोलीस अधिकारी, पोलिस प्राध्यापक, शिक्षक ,मुख्याध्यापक, वकील , इंजिनियर , उद्योजक त्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नावलौकिक करत असल्याने सर्वांना खूप आनंद झाला. कार्यक्रमाचे नियोजन कॉलेजमध्ये मित्र सुनील दाडगे जयश्री डोंगरी, शंकर शेरे, सरफराज पठाण या स्थानिक मित्रांनी केले. सर्व वेळात वेळ काढून वेगवेगळ्या ठिकाणावरून मुंबई, पुणे नाशिक, जळगाव, गंगाखेड या ठिकाणाहून उपस्थित राहिले. सर्व मित्रांनी या कार्यक्रमादरम्यान आपल्या कार्याचा परिचय दिला. सर्वांनी व्यक्त केले आहे. पूर्ण कार्यक्रम आपल्या कॉलेज जीवनातील अनुभवांना उजाळा दिला सर्वांना भेटून सर्वांना खूप चांगले वाटले. कार्यक्रम दरम्यान नृत्य, गायन, कविता, मनोगत, याद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

सर्वांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. 

लॉन व जेवणाची व्यवस्था जयश्री डोंगरे यांचे स्वतःचे लॉन असल्यामुळे खूप छान पद्धतीने करण्यात आली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow