सार्वजनिक बांधकाम विभागात खाली खुर्चीला दिले निवेदन
 
                                सार्वजनिक बांधकाम विभागात खाली खुर्चीला दिले निवेदन
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.26(डि-24 न्यूज)
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहुल जी.वडमारे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ढोल बजावो आंदोलन करण्यात आले. विभागीय चौकशी सुरू असलेले कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी मुख्य अभियंता यांना वारंवार निवेदने दिली तरीही कार्यवाही होत नसल्याने ढोल बजावो आंदोलन करण्यात आले. निवेदन स्विकारण्यासाठी कोणी अधिकारी उपलब्ध नसल्याने खाली खुर्चीला हार घालून कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले
 
.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            