विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पॅंथरची तीव्र निदर्शने...!

 0
विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पॅंथरची तीव्र निदर्शने...!

विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पॅंथरची तीव्र निदर्शने... 

बुद्धगया महा बुद्ध विहार बौद्धाच्या ताब्यात द्या या मागणीचे निदर्शने करून निवेदन देण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) बिहार येथील गया जिल्ह्यातील महा बुद्ध विहार हे पंडित (ब्राह्मण)यांच्या ताब्यात असून हे विहार बौद्ध भिकूच्या ताब्यात देण्यासाठी देशभरातील बौद्ध भिकू त्यासाठी अनेक वर्षापासून आंदोलने करत असून तेथील सरकार बौद्ध भिकू वर केसेस करीत आहेत अत्याचार करीत आहेत.

1949 मंदिर कायद्याने मंदिर म्हणून त्याला संभोदित आहेत परंतु हे मंदिर नसून सर्व बौद्ध बांधवाचे श्रद्धास्थान विहार आहे. वरील 1949 कायदा रद्द करून बौद्ध विहार बौद्ध भिकूच्या ताब्यात द्यावी अशा मागणीचे निदर्शने करून विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. येत्या 3 तारखेला भिकू संघाच्या निदर्शनाला पॅंथरने जाहीर पाठिंबा देऊन जास्तीत जास्त समाज बांधवांनी या निदर्शनास सहभागी होण्याच्या आवाहन करण्यात आले.

या निदर्शनाचे नेतृत्व लक्ष्मण भुतकर, प्रकाश सोनवणे धम्मपाल दांडगे यांनी केले.

यावेळी ऍड सिध्दार्थ गवई, ऍड.कैलास पवार, दशरथ कांबळे, प्रकाश पवार, संजय सरोदे, समाधान कस्तुरे, ऍड सतिश राऊत, राजानंद नवतुरे, राजकुमार कांबळे, दिलिप पवार, शरीफ लाला, अहमद पठाण, योगेश जुमडे, रामदास पागडे, गौतम म्हस्के, उत्तम डोंगरे, भीमराव गाडेकर, गौतम दाभाडे, पार्वती बाई घोरपडे, कलावती बाई साळवे, लीलाबाई निकम आदि सह मोठ्या संख्येने पँथर्स कार्यकर्ते सहभागी झाले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow