इम्तियाज जलिल यांच्या विरोधात प्रतिमोर्चा काढण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा, अमित भुईगळ यांची माहिती...

 0
इम्तियाज जलिल यांच्या विरोधात प्रतिमोर्चा काढण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा, अमित भुईगळ यांची माहिती...

वंचित बहुजन आघाडी इम्तियाज जलिल यांच्या विरोधात काढेल प्रतिमोर्चा - अमित भुईगळ

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)- पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव आणून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कलिम कुरेशी यांच्यासह 25 हुन अधिक मुस्लिम बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले. काही आरोपिंना अटक करुन हर्सुल जेल येथे पाठविण्यात आले. कलिम कुरेशी यांना न्यायालयीने एंटिसेप्टिक बेल दिली आहे. आमचा न्यायालयाच्या निर्णयावर व संविधानावर पूर्ण विश्वास आहे. इम्तियाज जलिल हे न्यायालयावर ताशेरे ओढत आहे हे चुकीचे आहे. कायदेशीर नाही. ते कायदा मोडून मोर्चा काढण्याचा इशारा देत असतील तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरुन प्रतिमोर्चा काढेल असा इशारा उशिरा रात्री पत्रकार परिषद घेवून वंचितचे नेते अमित भुईगळ यांनी दिला आहे. यावेळी कलिम कुरेशी व अफसरखान उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow