आगामी विधानसभा निवडणुकीत दबावगट निर्माण करण्यासाठी मुस्लिम समाजाची समिती
विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाचा दबावगटासाठी बैठक संपन्न, अन्याय वाढत असताना आवाज कोण उठवणार
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने आपल्या मतांद्वारे आपली ताकत लोकशाही बळकट करण्यासाठी दाखवून दिले परंतु त्यानंतर देशात व महाराष्ट्रात काय घडामोडी घडत आहेत ते खुल्या डोळ्याने बघत आहे. मुस्लिम समाजावर अन्याय वाढत आहे. मुस्लिम विरोधी कायदे बनवले जात आहे. ज्या राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीत मते घेतली त्या पक्षाचे नेते आज कोठे आहे ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम धार्मिक स्थळावर टाच आणली जात आहे. ते नेते बोलायला तयार नाही. मुस्लिम समाजाच्या बाजूने कोण उभे राहणार. मुस्लिम समाजाचा वापर फक्त मते घेण्यासाठी केला जातो का...? जेव्हा मुस्लिम समाजावर अन्याय होतो हे नेते पुढे येऊन न्याय मिळवून देण्यासाठी पुढे का येत नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांवर दबावगट निर्माण करण्यासाठी आज शहरातील विविध धार्मिक, सामाजिक व तज्ञांची महत्वाची बैठक झाली. Our Political Agenda या विषयावर मुस्लिम सोशल फोरम एण्ड महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फोरमच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती मजलिस ए शुराचे मुज्तबा फारुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी सांगितले या बैठकीत प्रमुख उपस्थिती मुस्लिम इत्तेहाद परिषदेचे मौलाना तौकीर रजा खान व दिल्लीतून आलेले मौलाना साद यांची उपस्थिती होती.
मुस्तबा फारुख यांनी पुढे सांगितले आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाची भुमिका काय असली पाहिजे. समाजाचे प्रश्न काय आहेत. समाजामध्ये जनजागृती करणे. राजकीय पक्षांनी आपल्यासाठी काय केले पाहिजे. त्यासाठी एक समिती गठीत करुन काही ठराव मांडून राजकीय एजंडा ठरवणार आहे. राजकीय एजंडा ठरवण्यासाठी बैठक संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. मुस्लिम समाजाचा राजकीय एजंडा काय आहे या विषयावर सविस्तर चर्चा केली. एक समिती गठीत करुन विविध विषयांचे तज्ञ आपापल्या भुमिका मांडतील. समाजाचे प्रश्न काय आहेत. राजकीय पक्ष फक्त समाजाचा वापर करून घेत आहेत का...? समाजाला प्रतिनिधित्व मिळते का...? राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद व विविध मंडळे आणि समित्यांवर भागिदारी मिळते का...? समाजाला योग्य न्याय मिळत आहे का...? मुस्लिम समाजासमोर आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा ते आम्हाला प्रश्न विचारतात त्यामुळे आम्हाला राजकीय पक्षांकडून ठोस आश्वासन मिळाले पाहिजे. जेव्हा आमच्यावर अन्याय होतो तेव्हा सत्ताधारी व विरोधी पक्षांची भुमिका काय ते स्पष्ट झाले पाहिजे. समाजात राजकारणाबद्दल व मतदान जनजागरण झाले पाहिजे अशा विविध विषयांवर चर्चा झाली. असे त्यांनी सांगितले.
मौलाना तौकीर रजा खान यांनी सांगितले वक्फ बील रद्द करावे व मुस्लिम समाजावर होत असलेल्या अन्यायाचे विरोधात व प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी दिल्लीत भव्य धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी दिल्लीगेट येथे सुरू असलेल्या बेमुदत साखळी धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भेट दिली व तेथे मार्गदर्शन केले.
What's Your Reaction?