पवित्र हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंनी देशासाठी प्रार्थना करावी - मौलाना नसिमोद्दीन मिफ्ताई

 0
पवित्र हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंनी देशासाठी प्रार्थना करावी - मौलाना नसिमोद्दीन मिफ्ताई

पवित्र हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंनी देशासाठी प्रार्थना करावी - मौलाना नसिमोद्दीन मिफ्ताई

औरंगाबाद, दि.25(डि-24 न्यूज) पवित्र हज यात्रेसाठी निवड होने फार महत्त्वाचे आहे. यावर्षी हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंनी देशासाठी व समाजासाठी दुवा करावी तेथे सर्व नमाज व इबादत व्यवस्थितपणे पार पाडावे असे मार्गदर्शन पहिल्या हज ट्रेनिंगसाठी आलेल्या यात्रेकरूंना मौलाना नसिमोद्दीन मिफ्ताई, हुज्जाज कमेटीचे अध्यक्ष यांनी केले आहे.

किले अर्क येथील हज हाऊसमध्ये सकाळी 9.30 वाजता पहिले प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले पवित्र हजचे स्वतःचे महत्व आहे. हज फर्ज असल्याने प्रत्येकाने जावे त्यांचे ते कर्तव्य आहे.

कार्यक्रमाची सुरुवात जामा मस्जिदचे इमाम व खतीब हाफिज जाकीर यांच्या कुराण पठनाने झाली. हाफिज असरार यांनी नात पठण केले. खिदमात-ए-हुज्जाज कमिटीचे अजिज कुरेशी यांनी मागिल 33 वर्षांचा तपशील सादर केला. मौलाना रिझवान नदवी यांनी हज यात्रेसंदर्भात मार्गदर्शन केले. केंद्रीय हज कमेटीचे सदस्य हाजी एजाज देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मिर्झा रफत बेग, डॉ.मोहंमद रहीमोद्दीन हज यात्रेच्या तयारीसाठी सविस्तर मार्गदर्शन केले. हज कमेटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद जुनेद यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अर्शद इंजिनिअर यांनी केले. प्रशिक्षण शिबिरात शहरातील व इतर ठिकाणचे दोन हजार हज यात्रेकरु सहभागी झाले होते. अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार प्रशिक्षण शिबिरात उपस्थित राहु शकले नाही त्यांचा लेखी संदेशचे वाचन अब्दुल बारी पटेल व जकीयोद्दीन सिद्दीकी यांनी वाचन केले. हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंचे त्यांनी अभिनंदन केले. देश आणि समाजासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

पुढील प्रशिक्षण 3 मार्च रोजी हज हाऊस येथे होणार आहे. हज यात्रेदरम्यान पाळण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने उमराह, हज व इतर विषयांवर सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचे यावेळी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow