इम्तियाज जलील यांच्या विरोधात भाजपा महिला मोर्चा अक्रामक, पुतळ्याला बांगड्या भरुन निषेध
इम्तियाज जलील यांच्या विरोधात भाजपा महिला मोर्चा अक्रामक, पुतळ्याला बांगड्या भरुन निषेध...
मोदींची मन की बात कार्यक्रम सुरू असल्याने एक तास उशीरा सुरू झाले आंदोलन... आंदोलनात अवतरले ओवेसी, एक व्यक्ती दाढी टोपी असलेला आणून ओवेसी आल्याचे भाण आंदोलनात करण्यात आले...त्याच्या हातात इम्तियाज जलील यांचे फोटो देऊन घोषणाबाजी केली...
औरंगाबाद,दि.24(डि-24 न्यूज) लोकसभेत महिला आरक्षणाच्या विरोधात मतदान केल्याने भाजपा महिला मोर्चाने एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात अक्रामक झाले आहे. एमआयएमचे अध्यक्ष बॅ. असदोद्दीन ओवेसी व इम्तियाज जलील यांचे फोटोंवर बांगड्या भरुन महिला कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत निषेध करत क्रांतीचौकात अक्रामक आंदोलन केले. पुतळ्याला सुध्दा चपलाने मारत विरोध प्रदर्शन केले. इम्तियाज जलील शरम करो शरम करो... येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवा, महिलांच्या विरोधात असलेल्या खासदाराचे करायचे काय, अशा घोषणा खासदारांच्या विरोधात यावेळी देण्यात आले. पुतळा ताब्यात घेण्यासाठी महिला पोलिस व महिला कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.
यावेळी आंदोलनात गाढव आणून गळ्यात खासदारांचे फोटो टाकून चपलेने महिलांनी मारत आपला राग व्यक्त केला.
याप्रसंगी शहराध्यक्ष शिरिष बोराळकर, महिला प्रदेश मोर्चा सरचिटणीस माधुरी अदवंत, प्रदेश सचिव शालिनीताई बुंदे, प्रदेश सरचिटणीस सौ.मिनाताई मिसाळ, महिला मोर्चा शहराध्यक्ष अमृता पालोदकर, लताताई दलाल, अर्चना निळकंठ, सुनंदा निकम, प्रतिभा जराड,सरिता घोडतुरे,गीता आचार्य, कविता देशमुख, रोहीनी खैरे, मिना घुंबरे, सुप्रिया चव्हाण,
What's Your Reaction?