पत्रकारांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध - गृहनिर्माण मंत्री अतुल सावे
पत्रकारांच्या हितासाठी सरकार कटीबद्ध - गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचे प्रतिपादन.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेच्या वतीने अपघात विमा वितरण सोहळा उत्साहात संपन्न.....
औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) सामाजिक घडामोडी नेमकेपणाने मांडणारी पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. निकोप समाज घडविण्यासाठी प्रसारमाध्यमांची गरज आहे. पण, समाजासाठी धडपणारा पत्रकार दुर्लक्षित राहतो. पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी सरकार कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेच्या वतीने अपघात विमा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. मौलाना आझाद संशोधन केंद्रात रविवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुभाष पाटील, डॉ. सुरेश पुरी, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, सरचिटणीस चेतन कात्रे, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया, मराठवाडा सरचिटणीस शेखलाल शेख, जिल्हाध्यक्ष सतीश रेंगे पाटील, महानगर अध्यक्ष रवी माताडे, फोटो ग्राफर विंग जिल्हाध्यक्ष शाम पलाये, साप्ताहिक विंग मराठवाडा अध्यक्ष अब्दुल कय्युम, विमा प्रतिनिधी मकसूद खान, डॉ. शेख शकील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी 111 पत्रकारांना प्रत्येकी 10 लाख रुपये मर्यादेचा एकूण 11 कोटी 10 लाख रुपयाचे अपघात विमा पत्र वितरित करण्यात आले. वाळूज, फुलंब्री, गंगापूर, खुलताबाद येथील कार्यकारणीला नियुक्तीपत्रेही प्रदान करण्यात आली.
'पत्रकारिता हा समाजाचा आरसा आहे. पण, पत्रकारांच्या काही अडचणी असू शकतात यांच्याकडे कुणी लक्ष दिले नाही. लोकप्रतिनिधींना योग्य कामांसाठी माध्यमे नेहमीच दिशादर्शक असतात. पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी हा अपघात विमा उपयोगी ठरेल', असे सभापती अनुराधा चव्हाण म्हणाल्या. 'काळानुसार पत्रकारांचा पेहराव बदलला, पण वैयक्तिक समस्या संपल्या नाहीत. जगभरात पत्रकारांची संघटन व्हावे या उद्देशाने स्थापन झालेली ही संघटना नक्कीच आदर्श आहे. या माध्यमातून पत्रकारांना विमा संरक्षण मिळत आहे. समाजाच्या विविध घटकांशी जोडण्याचे काम करून ही संघटना नक्कीच विधायक काम करेल अशी खात्री सुभाष पाटील यांनी व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी पत्रकारांच्या महामंडळासाठी संघटना प्रयत्न करीत असल्याची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत पत्रकारांना श्रद्धांजली वाहून दिवंगत ज्येष्ठ पत्रकार बाबुराव जुंबडे यांच्या कुटुंबीयांचा पहिला विमा वितरीत करण्यात आला.
विमा वितरण व्यवस्थापन मनोज टाक, हनुमान लव्हाळे, प्रतीक शिंदे यांनी केले. जिल्हा अध्यक्ष सतीश रेंगे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा महासचिव अमित फुटाणे यांनी सूत्रसंचालन केले आणि शहर कार्यवाहक उमेश जोशी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला वाळूज महानगर अध्यक्ष किशोर बोचरे, गंगापूर तालुका अध्यक्ष रामेश्वर अमृते, वैजापुर तालुका अध्यक्ष प्रशांत त्रिभुवण, फुलंब्री तालुका अध्यक्ष नवनाथ इधाटे, खुलताबाद तालुका अध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह शहर तथा जिल्हाभरातील पदाधिकारी, पत्रकार उपस्थि
त होते.
What's Your Reaction?