मिलेनियम इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

मिलेनियम इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
औरंगाबाद, दि.4(डि-24 न्यूज) पहीली ते आठवी वर्गाचे मिलेनियम इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे सादरीकरण करत अति मोबाईलच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर कसा परिणाम होतो याबद्दल नाट्य सादर केले. चिमूकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. उल्लेखनीय कला सादर करणारे विद्यार्थी व शाळेत शिक्षकांची चांगले अध्यापनाचे काम केल्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष अब्दुल मुकीम देशमुख व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरव करण्यात आला.
मिलेनियम इंग्लिश स्कुल हे एकता एज्युकेशनल एण्ड कल्चरल सोसायटी अंतर्गत मिसारवाडी येथे कार्यरत आहे. शिक्षणाचा दर्जा चांगला असल्याने शेकडो विद्यार्थी येथे शिक्षण घेतात.
आज झालेल्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल मुकीम देशमुख, प्रमुख पाहुणे डॉ.सय्यद फैसल, डॉ.हफिज देशमुख, संस्थेचे सचिव झिशान देशमुख, शाळेचे संचालक अमान देशमुख, प्राचार्य साजिद शहेजाद शेख, समन्वयक शेख रहीम, नजीब फारुकी, इम्रान शेख व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालकांची उपस्थिती होती
.
What's Your Reaction?






