रमेश बिदुडीच्या विरोधात काँग्रेसचे जोडेमारो आंदोलन

भाजप नेते रमेश बिदूडी यांना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जोडे मारो आंदोलन व रमेश बिदुडी यांची भाजपातून हकालपट्टी करावी
छत्रपती संभाजीनगर (डि-24 न्यूज) दोन दिवस अगोदर भाजपचे नेते कालका विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रमेश बिदुडी यांनी देशाच्या नेत्या व खासदार प्रियंका गांधी यांच्या बद्दल अपमान जनक वादग्रस्त वक्तव्य केले म्हणून महिलांच्या भावना दुखावल्या त्याकरिता आंबेडकर नगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रमेश बिदुडी यांच्या प्रतिमेला जोडे मारो (चप्पल मारो )आंदोलन शहर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सौ मंजुताई लोखंडे नेतृत्वाखाली आंदोलन घेण्यात आले.
भाजपचे नेते व दिल्ली विधानसभा उमेदवार रमेश बिदोडी यांनी खासदार प्रियंका गांधी व यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी सिंग यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केले. बिदुडींनी खासदार असताना संसदेत मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरले होते. रमेश बिदुडी हे भाजपचे नेते असून वारंवार महिलांचा अल्पसंख्याक समाजाचा अपमान करतात म्हणून भाजपाने त्यांना उमेदवारी नकारून त्यांची पक्षातून हाकालपट्टी करावी अशी मागणी महिलांच्या वतीने करण्यात आली. यावेळी महिलाओ के सन्मान में काँग्रेस मैदान, प्रियंका गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, रमेश बिदोडी मुर्दाबाद रमेश बिदुडी माफी मांगो अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस डॉ. जफर अहमद खान, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक काँग्रेसचे उपाध्यक्ष इब्राहिम पठाण, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ काळे, शहर जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ अरुण शिरसाट, अनिस पटेल, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ज्येष्ठ नेते आकिफ रझवी, रेखाताई राऊत, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव इरफान इब्राहिम पठाण, प्रतापसिंह होलिया, मंजूताई लोखंडे, अरुणाताई लांडगे, रवी लोखंडे, परविन बाजी देशमुख, अकलाक पटेल, शकुंतला ताई खरात, रंजनाताई साळवे, शारदा बाई मगरे, कडूबाई मस्के, रेखा बाई लहाने, कौतिक बाई कसबे, रेखा जाधव, संगीता जाधव, छाया बाई त्रिभुवन, मैना आपुट, सुमन बाई साळवे, लता बाई नितनवरे, भंडारे बाई, मीनाज पटेल, संजय जाधव, रियाज पटेल आदी आंदोलनाला उपस्थित होते. जोडे मारून आंदोलनामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेखाताई राऊत व रवी लोखंडे यांनी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?






