एमआयएमने केला माजी नगरसेवकांचा पत्ता कट, पक्षात फुट, इम्तियाज जलिल हटावचा नारा...
एमआयएमने दिली नवीन चेह-यांना संधी, माजी नगरसेवकांचा पत्ता कट, इम्तियाज जलिल यांच्या राजीनाम्याची मागणी...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) - उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरात एमआयएम पक्षात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पक्षाने नवीन चेह-यांना संधी देत बोटावर मोजण्या इतके माजी नगरसेवकांना उमेदवारी देत अनेक माजी नगरसेवकांचा पत्ता कट झाल्याने एमआयएमचे नेते नासेर सिद्दीकी व कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलिल यांचे फोटो फोडून राग व्यक्त केला व पक्षाचे सुप्रीमो बॅ.असदोद्दीन ओवेसी यांच्याकडे इम्तियाज जलिल यांना हटवा एमआयएम वाचवा अशी मागणी नासेर सिद्दीकी व काही माजी नगरसेवकांनी केली आहे. नासेर सिद्दीकी यांनी सांगितले महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे इम्तियाज जलिल व त्यांचे चिरंजीव यांनी फायनल केले तिकीटाची विक्री केली आहे याचे पुरावे पक्षाला देणार आहे. ज्यांनी पक्षाला उंचीवर नेले पक्षासाठी परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून ज्यांनी पक्षासाठी काही योगदान दिले नाही त्यांना तिकीटे मिळाली. माझ्या प्रभागातील मते दुसऱ्या प्रभागात टाकून राजकारणात संपवण्याचा प्रयत्न इम्तियाज जलिल यांनी केला आहे. माजी नगरसेवक हाजी इसाक व सलिम सहारा यांना तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. कोअर कमिटीचा निर्णय असल्याचे इम्तियाज जलिल बोलत आहे त्यांनी कमिटीतील सदस्यांची नावे सांगावे. बॅ.असदोद्दीन ओवेसी यांचे आदेश पाळण्यात आले नाही. ज्यांना ओवेसींनी वचन दिले त्यांनाही उमेदवारी दिली नाही. पक्षाचे नेते फारुख शाब्दी यांनी राजीनामा दिला. मुंबईत जावून इम्तियाज जलिल यांनी त्यांचे न ऐकता आपल्या मर्जीने उमेदवार फायनल केले. एमआयएम पक्षाला वाचवायचे असेल तर ओवेसींनी इम्तियाज जलिल यांना हटवावे नसता पक्षाचे या निवडणुकीत मोठे नुकसान होणार आहे. अब्दुल कदीर मौलाना यांचे चिरंजीव ओसामांचे पक्षासाठी काय योगदान आहे त्यांना उमेदवारी का देण्यात आली, पैसे घेऊन तिकीटे दिली असा प्रश्न नासेर सिद्दीकी यांनी उपस्थित केला आहे.
माजी नगरसेवक शेख अहेमद, नासेर सिद्दीकी, जमीर अहेमद कादरी, जफर बिल्डर, रफीक शेख, आरेफ हुसेनी, अब्दुल अजिम, हाजी इर्शाद, विकास एडके, रफत यारखान, अयूब जहागिरदार, डॉ.अफजाल खान, अबुल हसन, काँग्रेस सोडून एमआयएम मध्ये आलेले माजी नगरसेवक अयूब खान यांचा पत्ता कट झाल्याने पक्षात गोंधळ उडाला आहे
.
What's Your Reaction?