अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, पंचनाम्यातचे दिले आदेश - उपमुख्यमंत्री अजित पवार
अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, पंचनाम्यातचे दिले आदेश – उपमुख्यमंत्री अजित पवार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) - महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाती आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जनावरे वाहून गेली, तर काही ठिकाणी मानवी जीवितहानीसुद्धा झाली.
मंगळवारी (१६ सप्टेंबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. पालकमंत्र्यांनाही याबाबत प्रत्यक्ष पाहणी करण्यास सांगितले आहे. पंचनामा झाल्यावर नेमकं नुकसान किती झाले याचा हिशोब स्पष्ट होईल.
असे वक्तव्य आज शहराच्या दौ-यावर आले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पवार पुढे म्हणाले की, “दसर्यापर्यंत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल आणि ती थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाईल. राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांना वा-यावर सोडणार नाही असे ते म्हणाले.
मंगळवारी ते छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी संत एकनाथ रंगमंदिरात झालेल्या प्रवेश समारंभात माजी आमदार शिवाजी चोथे व त्यांचे शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. या समारंभाला आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, माजी आमदार सुरेश जेथलिया, माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की अतिवृष्टीने मराठवाडा, विदर्भासह अनेक भागांतील शेतकरी संकटात आले आहेत. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या सोबत असून त्यांना न्याय देण्यात येईल. बीडमध्ये काही लोक पावसामुळे अडकले होते. त्यावेळी सुरेश धस यांच्या संपर्कानंतर बीडमध्ये हेलिकॉप्टर पाठवून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. बीडच्या नागरिकांनी सांगितलं की, अनेक वर्षांनी अशी परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे.
पवार पुढे म्हणाले की, “मी जेव्हा जलसंपदा मंत्री होतो तेव्हा माझ्यावर निराधार आरोप केले गेले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात तापी, मांजरा नदीवर धरणे उभारण्यात आली. आज त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मराठवाड्याची जमीन खूप सुपीक आहे. इथे जे काही पिके घेतली जातात ती चांगली उगवतात. मात्र मराठवाड्यात आजही पावसामुळे समस्या कायम आहे. जालना, बीड व अन्य भागांत पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
सेवन हिल एमजीएम रुग्णालयात समोर अजित पवार यांनी भव्य संपर्क कार्यालयाचे उद्घाटन फित कापून करण्यात आले. यावेळी त्यांचे येथे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी भाषणात सांगितले अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जावून समस्या सोडवावी. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबल्या होत्या आता जानेवारी पर्यंत नवीन पदाधिकारी निवडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. हि निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. तोंड पाहून उमेदवारी दिली जाणार नाही तर जनतेमध्ये राहणारे जनतेच्या समस्या सोडवणा-यांना त्यांचा आवडता उमेदवार मेरीट नुसार दिला जाईल असे आदेश त्यांनी दिले. याप्रसंगी आमदार तथा जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, शहराध्यक्ष अभिजित देशमुख, डॉ.गफार कादरी, कार्याध्यक्ष कय्यूम अहेमद, नबी पटेल, रफीक भाईजी, आजम शेख, विनोद जाधव व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?