मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त काँग्रेसचे ध्वजारोहण...

 0
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त काँग्रेसचे ध्वजारोहण...

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त काँग्रेस तर्फे ध्वजारोहण...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) -

आज दि. 17 सप्टेंबर 2025, बुधवार रोजी, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सकाळी 8 वाजता शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्ष कार्यालय, गांधी भवन येथे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्या हस्ते तर शहर जिल्हाध्यक्ष शेख युुसूफ यांच्या हस्ते 8.15 वा. महात्मा गांधी पुतळ्याजवळ, सराफा, शहागंज येथे ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी वीर क्रांतिकारक व हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. शौर्य आणि त्यागाच्या या समरात हुतात्मा झालेल्या वीरांचे बलिदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या संघर्षामुळेच आज मराठवाडा मुक्त झाला आणि आपण स्वतंत्र श्वास घेऊ शकतो.

यावेळी खा.डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ, माजी मंत्री अनिल पटेल, प्रदेश सरचिटणीस ॲड. संदीप पाटील, भाऊसाहेब जगताप, कांचनकुमार चाटे, एम. के. देशमुख, साहेबराव बनकर, शेख कैसर बाबा, संगठन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, निमेष पटेल, योगेश थोरात, मनोज शेजुल, बोरचटे सर, सलीम खान, प्रमोद सदाशिवे, रमेश काळे, ऍड. सुभाष देवकर, सलीम पटेल, जावेद खान, मोहसिन लकी, हरीभाऊ राठोड, चंद्रप्रभा खंदारे यांच्यासह काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow