किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवून केला विरोध प्रदर्शन, कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

किरीट सोमय्या यांचा आरोप – संभाजीनगर, मालेगावात बनावट दाखल्यांद्वारे प्रमाणपत्रे...
एसडिपिआयच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून विरोध दर्शवला, पोलिसांनी घेतले ताब्यात...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी आज मंगळवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात समोर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठा आरोप केला की संभाजीनगर व मालेगाव येथे अनेकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे मिळवली आहेत.
सिटी चौक पोलीस ठाण्यात 40 जणांवर गुन्हे दाखल झाले.
सिल्लोड पोलीस ठाण्यात तब्बल 300 जणांवर गुन्हे दाखल होणार आहेत.
एकूण 700–800 जणांनी बनावट जन्म प्रमाणपत्रे घेतली असून त्यांना आरोपी बनवले जाणार आहे.
पुढील 15 दिवसांत सुमारे 1 हजार लोकांवर गुन्हे दाखल होतील अशी माहिती सोमय्या यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी वेळेवर कारवाई केली नाही म्हणून हे प्रकरण उघड करावे लागले असेही ते म्हणाले.
त्यांनी उदाहरण देताना सांगितले की मालेगावात एका व्यक्तीने स्वतःचा जन्म 1960 सालचा असल्याचे सांगून प्रमाणपत्र घेतले. ज्यांच्याकडे जन्मदाखले नाहीत, अशांनीसुद्धा फसवे कागद सादर करून प्रमाणपत्रे मिळवली आहेत.
सोमय्या म्हणाले, “बांगलादेशचे प्रतिनिधी आले तर त्यांचे स्वागत करु. मात्र घुसखोरी अजिबात सहन केली जाणार नाही.”
जिल्हाधिकारी कार्यालयात जेव्हा किरीट सोमय्या दाखल झाले प्रवेशद्वारावर एसडिपिआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून विरोध केला. जन्म प्रमाणपत्रे व धार्मिक स्थळांवरचे भोंगे विशिष्ट जातीच्या लोकांना टार्गेट करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा ते जाणूनबुजून प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. त्यांच्या विरोधात यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन क्रांतीचौक पोलिस ठाण्यात नेऊन कार्यवाही करुन सोडले.
What's Your Reaction?






