अंमली पदार्थ 11 विक्रेत्यांची पोलिसांनी काढली दोन किलोमीटर पर्यंत धिंड... बघ्यांची गर्दी...

अंमली पदार्थ 11 विक्रेत्यांची पोलिसांनी काढली धिंड...
अवैध नशेचा गोरखधंदा करणा-यांना शिकवला धडा, दोन किलोमीटर पायी, विना चप्पल बुट, चौका चौकात गुढग्यावर बसवले...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) शहरात मोठ्या प्रमाणात शहर पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी कार्यवाई सतत सुरू आहे. शहरात गुंगी आणणाऱ्या औषधांचा मोठा पुरवठा होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर अंमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) वाळूज परिसरातील व्हीआरएल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित पार्सल कंपनीवर 13 सप्टेंबर रोजी छापा मारला होता या छाप्यात 2504 कोरेक्स सिरपच्या बाटल्यांसह (20 बॉक्स), कार (एमएच-18-बीसी-6767), रिक्षा, मोबाइल आणि बनावट कागदपत्रे, बिल व परवाने असा सुमारे 12 लाख 48 हजार 200 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी 13 आरोपिंना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे तर एकूण 41 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपिंची आज 7.30 वाजेदरम्यान धिंड काढण्यात आली. दोन किलोमीटर पर्यंत यांना विना चप्पल बुट, हातात हतकडी घालून पायी धिंड काढण्यात आली. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. चौका चौकात गुढग्यावर बसवले. 2 आरोपिंना तपासासाठी नेले तर 11 जणांची धिंड यावेळी काढण्यात आली. चौका चौकात थांबवून चेहरे जनसमुदायाला दाखवण्यात आले. कोणी अंमली पदार्थ विक्रीचा गोरखधंदा करत असेल तर अशा प्रकारे भविष्यात धिंड काढून धडा शिकवला जाईल असा इशारा यावेळी पोलिसांनी दिला आहे.
जुना मोंढा रविवार बाजार पासून मोती कारंजा, जुना मोंढा, रेंगटीपुरा, जीन्सी चौक, जीन्सी, बायजी पुरा, सेंट्रल नाका या परिसरात या आरोपींनी पायी घुमवले.
यामध्ये अविनाश रामकृष्ण पाटील (वय 34, रा. शिरसगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), अरशद इब्राहीम पठाण (वय 26, रा. बायजीपुरा), समीर शेख युनिस शेख (वय 23, रा. मोतीकारंजा), अब्दुल अजिम कदीर शहा (वय 30, रा. शहानुरवाडी), मोसीन अमिन तांबोळी ( वय 25, बायजीपुरा), सय्यद समीर सय्यद शौकत उर्फ स्टायलो ( वय 27, बायजीपुरा), सोहेल हानिफ शाह ( वय 24, बायजीपुरा), सोहेल सलीम ईलाबी (वय 20, नवाबपुरा, मोंढा रोड), रिजवान खान रशिद खान ( वय 25, रेंगटीपुरा), सय्यद अल्ताफ जफर ( वय 22, बायजीपुरा), अमोल दत्तात्रय येवले ( वय 30, धामोडे, येवला, नाशिक), रूपेश रामकृष्ण पाटील ( वय 29, शिरसगाव टाकळी, चाळीसगाव, जळगाव) यापैकी 11 आरोपिंची धिंड काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे आरोपी या परिसरात कोडिनयुक्त सिरपची औषधी विक्रीचा गोरखधंदा करत असताना आढळले आहे. यांची कसून चौकशी केली जात आहे.
What's Your Reaction?






