मराठवाड्यात विजेचा तांडव, वीज पडून 2 ठार 3 गंभीर जखमी, 26 जनावरे दगावली, अनेक घरांचे पत्रे उडाले.....

मराठवाड्यात विजेचा तांडव, वीज पडून 2 ठार, 3 गंभीर, 26 जनावरे दगावली, अनेक घरांची पत्रे उडाला, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान....
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज)
आज दुपारी मराठवाड्यात अवेळी पावसाने हाहाकार उडवला. वादळी वा-यासह विजेच्या कडकडाटासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात दोन ते तीन तास मुसळधार पाऊस झाला. या अवेळी पावसाने शेतक-यांच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. विजेनेही तांडव माजवले. भोकरदन तालूक्यातील मौजे कोठा कोळी येथील सचिन विलास बावस्कर, वय 30, गणेश प्रकाश जाधव हे वीज पडून मयत झाले आहे. एक व्यक्ती गंभीर जखमी आहे त्यांचे नाव कळू शकले नाही. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालूक्यातील मौजे डोंगरगाव येथील सय्यद बंदगी पटेल यांच्या अंगावर झाड कोसळले यामध्ये ते गंभिर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. तसेच शिवराज अशोकराव जाधव यांच्या पायाजवळ वीज पडल्याने पाय भाजला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मराठवाड्यात एकूण वीज पडून 10 म्हशी, 2 गाय, एक बैल, 6 शेळ्या, 3 मेंढ्या, दोन वासरे, दोन वगार दगावल्या आहे. हा प्राथमिक आकडा प्रशासनाच्या वतीने डि-24 न्यूजला मिळाला आहे. यामध्ये आकडा वाढण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले तर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे झाल्यानंतर पूर्ण माहिती मिळेल. छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद) तालूक्यातील कृष्णपूरवाडी येथील वादळी पावसामुळे अनेक लोकांच्या घरावरचे पत्रे उडून गेले आहे. सुमारे 20 घरांचे पत्रे उडून गेले तर पत्रा लागून संगिता बाबासाहेब घोडके या महीला जखमी झाल्याचे सरपंच चरण कवंदे यांनी सांगितले. तलाठी संतोष बोडके यांनी अवकाळी वादळी पावसामुळे गावात झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले. यावेळी सरपंच चरण त्र्यंबक कवंदे, उपसरपंच चरण बहुरे व नागरीक उपस्थित होते.
मराठवाड्यातील सविस्तर माहिती अशी....
लातूर जिल्हा...
दिनांक 19.05.2025
1. तानाजी रामदास पवार रा. माळहिप्परगा तालुका जळकोट यांच्या शेतात गट न 434 मध्ये म्हैस बांधलेली होती . अंदाजे 8:30 वाजता अवकाळी पाऊस चालू असताना वीज पडून म्हैस दगावली आहे.
2. मौजे बामणी तालुका निलंगा येथे सदाशिव रामकिशन जाधव यांची गाय अंदाजे 6,00 वाजता वीज पडून मयत झाली आहे पीएम करण्यास सांगितले आहे.
3. उदगीर तालुक्यातील हाळी,येथील अमोल अंगदराव भोसले व नंदकिशोर अंगदराव भोसले यांची दोन म्हैस शेतामध्ये वीज पडून मयत झाली आहे.
4. केरबा विठ्ठल केंद्रे रा. गुत्ति तालुका जळकोट यांच्या शेतात गाय बांधलेली होती . अंदाजे 8:30 वाजता अवकाळी पाऊस चालू असताना वीज पडून गाय दगावली आहे.
5. मौजे शिंदाळा ज ता औसा येथील रहिवासी प्रभू शंकर जाधव यांची. म्हेस सेलू शिवारात गट 103 मध्ये दि 18/5/2025 रोजी सायंकाळी 5:15 ते 5:30 च्या दरम्यान वीज पडून म्हेस मृत्यूमुखी पडली आहे.
6. मौजे खुलगापुर taluka लातूर येथील विनायक महादु सोनवणे यांची म्हैस दि. 19/05/20250 रोजी रात्री 2 च्या सुमारास वीज पडून मृत्युमुखी पडली.
7. मौजे शिऊर तालुका लातूर येथील धोंडीराम रामधन जाधव यांची मैहस रामदास सूर्यवंशी गट न 80 मध्ये आज दि 18/05/20250रोजी 3.30 चा दरम्यान वीज पडून मृत्युमुखी.
करिता सबब माहितीस्तव.
लातूर जिल्हा...
दिनांक 19.05.2025
1. विलास पांडुरंग सूर्यवंशी, धानोरा, ता निलंगा सहा शेळ्या, वीज पडून दगावले.
2. मौ. शेडोळ तालुका निलंगा येथील शेतकरी ज्ञानेश्वर बब्रुवान धुमाळ यांची म्हैस आज दिनांक 19/05/2025 रोजी अंदाजे चार वाजता वीज पडून मयत झाली आहे.
3. मौजे हालसी तु. तालुका निलंगा येथील शेतकरी श्री वामन रामराव सावरे यांच्या दोन म्हशी आज ४.०० वाजताच्या दरम्यान मौजे हालसी तु. येथील गट क्र. २४२ मधील शेतीत बांधलेल्या असताना वीज पडून मयत झाल्या आहेत
4. मौजे अंबुलगा बु. तालुका निलंगा येथील शेतकरी बंकट राजाराम सूर्यवंशी यांच्या बैल अंदाजे 4:30 वाजता वीज पडून मयत झाला आहे.
लातूर जिल्हा....
दिनांक 19.05.2025
श्री.महेबुब बाशासाब मुजेवार रा. येरोळ तालुका शिरूर अनंतपाळ यांची एक वागार अचानक घरासमोर झाडाखाली विज पडून मरण पावली अंदाजे वय दोन ते अडीच वर्षांची आहे वेळ अंदाजे 5.00/5.15 वाजता हे येरोळ येथिल अलपभुधारक शेतकरी खातेदार आहेत.
मौजे कोठा कोळी ता.भोकरदन 1) सचिन विलास बावसकर वय 30 वर्ष 2) गणेश प्रकाश जाधव हे दोघे दिनांक 19/05/2025 रोजी अंदाजे 1.30 वाजता वीज पडून मयत झाले व 1 गंभीर जखमी आहे असे तहसीलदार यांनी कळविले आहे, माहितीस्तव सादर.
जालना जिल्हा आपत्कालीन घटनेचा तपशील
भोकरदन तालुका...
१) मौजे कोठा कोळी येथील दिनांक 19/05/2025 रोजी अंदाजे 1.30 वाजता वीज पडून 1) सचिन विलास बावसकर वय 30 वर्ष 2) गणेश प्रकाश जाधव हे दोघे मयत झाले व 1 गंभीर जखमी आहे..
२) मौ नळणी बु गट न 12 मधे काल झालेल्या पावसात वीज पडून नामदेव तुकाराम गोयेकर यांच्या 3 मेंढ्या मृत्यू पावल्या
जाफ्राबाद तालुका...
१) मौजे देवळे गव्हाण शिवारात गट क्र 220 मध्ये नारायण रुस्तुम बनकर याची दोन वासरे वीज पडून मयत झाली
अंबड तालुका...
१) मौजे रोहीलागड येथील पांडुरंग विठ्ठल टकले यांचे 1 म्हैस व 1 वगार वीज पडून मयत
मंठा तालुका...
वर्दीचा प्रकार:- आगीची वर्दी
वर्दी दिनांक: -19/05/2025 वेळ दुपारी 3:30
वर्दी प्राप्त देणारा: - बाबू भाई शेख अंबुलन्स ड्रायव्हर
वर्दीचे ठिकाण :- सराटे वझर ता जालना जि जालना.
वर्दी विवरण: - इब्राहीम दादामिया पठाण यांच्या घरामध्ये दोन सिलेंडर होते त्यापैकी एक सिलेंडर स्पोट झाला घरातील संसार रुपी साहित्य ला आग लागली होती जीवित हानी झाली नाही सदर वर्दी मिळताच घटनास्थळी अग्निशमन वाहनाच्या साह्याने आग विजविण्यात आली सदर आग हि विमोचन करण्यास 20 मिनिट लागले.
नांदेड जिल्हा...
मौजे डोंगरगाव ता. नायगाव येथे आज दि. 19 मे 2025 रोजी वादळी वाऱ्याने सय्यद बंदगी पटेल यांच्यावर झाड कोसळसे ते दवाखान्यात अँडमिट आहेत,तसेच शिवराज अशोकराव जाधव यांच्या पायाजवळ वीज पडली त्यांचे पाय भाजले ते दवाखान्यात अँडमिट आहेत. करिता प्राथमिक माहिती सादर
What's Your Reaction?






