केंब्रिज चौक ते नगर नाका उड्डाणपुलाच्या कोणशिलेला शिवसेनेने घातला गाजराचा हार...
कॅम्ब्रिज चौक - नगर नाका उड्डाणपुलाच्या कोनशिलेला गाजराचा हार
शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रतीकात्मक आंदोलन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ), दि.6(डि-24 न्यूज)- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ‘मराठवाड्याचा विकास, तुम से ना हो पायेगा!’ या मराठवाडाव्यापी जनआंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून कॅम्ब्रिज चौक ते नगर नाका प्रस्तावित उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रविवार, 6 सप्टेंबर रोजी प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.
कॅम्ब्रिज चौक ते नगर नाका या उड्डाणपुलाच्या प्रस्तावाला तत्कालीन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले होते. 17,706 कोटींच्या विकासकामांची सरकारकडून घोषणा करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात या उड्डाणपुलाचे अपेक्षित काम झाले नाही. एक टक्काही काम झाले नसताना केवळ कोनशिला बांधून घोषणा करण्याचा प्रकार सुरू आहे.
या वेळी नारळ फोडून तसेच तत्कालीन अनावरण पत्रिकेला गाजराचा हार घालून सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. शिवसेना नेते, आमदार तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्वतः गाजराचा हार घालून हे प्रतीकात्मक आंदोलन केले.
“सरकार कोनशिला बांधते, घोषणा करते; मात्र प्रत्यक्ष कामाच्या वेळी जनतेच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी केवळ घोषणा केल्या जात असून प्रत्यक्षात कामे अपूर्ण आहे. सरकारच्या घोषणांना आणि प्रत्यक्ष कामाच्या स्थितीला जनतेसमोर आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे अंबादास दानवेंनी सांगितले.
What's Your Reaction?