जमीर अहेमद कादरी पुन्हा एमआयएमच्या प्रवक्ते पदी, इम्तियाज जलिल यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान
जमीर अहेमद कादरी एमआयएमचे प्रवक्ते, इम्तियाज जलिल यांची घोषणा...
नवीन दमदार टीमची घोषणा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 5 (डि-24 न्यूज) — हज हाऊसच्या सभागृहात एमआयएमच्या शहर कार्यकारिणीची घोषणा शुक्रवारी शहराध्यक्ष नासेर सिद्दीकी यांनी केली. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बुलंद तोफ माजी नगरसेवक जमीर अहेमद कादरी यांची एमआयएमच्या प्रवक्ते पदी नियुक्तीची घोषणा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी करत त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करुन सत्कार केला.
जमीर अहेमद कादरी हे शम-ए-रहेबर उर्दू दैनिकाचे मुख्य संपादक आहेत. सन 2014 पासून सक्रिय राजकारणात आहेत. आरेफ काॅलनी वार्डातून गेल्या महापालिका निवडणुकीत विजयी झाले त्यानंतर त्यांनी वार्डाचा कायापालट केल्याने चर्चेत आले. महापालिकेत विरोधीपक्षनेते म्हणून जवाबदारी सांभाळली. प्रवक्ते पदही सांभाळले. त्यांना या निवडणुकीत तिकीट दिले नसल्याने थोडे नाराज होते परंतु त्यांना पुन्हा प्रवक्ते पद देवून पक्षाने नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील विविध राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत प्रचार दौरे केले त्यांची भाषणं शैली प्रभावित करणारी असल्याने प्रवक्ते पदी नियुक्ती करुन राजकीय पुनर्वसन झाले असे वाटत आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना यावेळी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला व्यासपीठावर प्रदेश पदाधिकारी प्रभाकर पारधे, जिल्हाध्यक्ष शारेक नक्शबंदी, विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर, गटनेते हाजी शेरखान, नगरसेवक शेख अहेमद, युवा जिल्हाध्यक्ष इद्रीस नवाब यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जमीर अहेमद कादरी यांचे अभिनंदन केले.
What's Your Reaction?