ओवेसींच्या दौ-याच्या अगोदर एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांनी दिला राजीनामा...!
ओवेसींच्या दौ-याच्या अगोदर एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांनी दिला राजीनामा
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.11(डि-24 न्यूज) 13 व 14 जुलै रोजी एमआयएमचे सुप्रीमो खासदार असदोद्दीन ओवेसी शहराच्या दौ-यावर येण्याची शक्यता आहे. त्यांच्या दौ-यावर येण्याच्या दोन दिवस अगोदर एमआयएमचे जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्विकारुन आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने एमआयएममध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील बुढीलेन येथील दारुस्सलाम येथे पत्रकार परिषदेत त्यांनी राजिनाम्याची घोषणा केली. पक्षाच्या वतीने हा राजिनामा स्विकारला जातो किंवा नाही हे बघावे लागेल. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष खा.असदोद्दीन ओवेसी व प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना पाठवलेल्या राजिनामा पत्रात हा उल्लेख केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत इच्छुक असल्याने निवडणुकीच्या तयारीसाठी जवाबदारी तून मुक्त करावे. मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि राहणार असेही राजिनामा पत्रात म्हटले आहे. पक्षाने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मागणी पत्रात केली आहे. औरंगाबाद मध्य मधून अथवा औरंगाबाद पूर्व मधून इच्छुक आहेत का याचा उल्लेख राजिनामा पत्रात केलेला नाही.
What's Your Reaction?