12 लाखांचा जनसागर, 250 ट्रॅक्टरांचा ताफा, 250 भोंगे, 100 वाकीटाकी, 10 अॅम्बूलन्स शांतता रैलीत असणार

 0
12 लाखांचा जनसागर, 250 ट्रॅक्टरांचा ताफा, 250 भोंगे, 100 वाकीटाकी, 10 अॅम्बूलन्स शांतता रैलीत असणार

12 लाखांचा जनसागर, 250 ट्रॅक्टरांचा ताफा, 250 भोंगे, 100 वाकीटाकी, 10 अॅम्बूलन्स शांतता रैलीत असणार

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.11(डि-24 न्यूज) मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता संवाद समारोप रैलीचे सकल मराठा समाजाने जय्यत तयारी केली आहे. 13 जूलैला होणा-या या रैलीचे नियोजन करण्यात आले आहे यासाठी पोलीस प्रशासन, महानगरपालिका, आरोग्य विभागाने सहकार्य केले आहे.

हि एवढी मोठी ऐतिहासिक रैली कोपर्डी घटनेनंतर निघालेल्या मोर्चाचेहि रेकॉर्ड तोडणार अशी अभुतपुर्व असणार आहे. अशी माहिती सकल मराठा समाजाने पत्रकार परिषदेत दिली आहे.

सकाळपासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत जालना रोड वाहतूकीसाठी बंद असणार आहे. खुलताबाद येथून रैलीत सकाळी 250 ट्रॅक्टरांचा ताफा वसंतराव नाईक चौकापर्यंत येणार आहे. तेथे जरांगे पाटील यांच्या भव्य स्वागतासाठी भव्य व्यासपीठ असणार आहे. सिडको बसस्थानक ते क्रांतीचौक पर्यंत 250 भोंगे भाषण ऐकण्यासाठी लावण्यात येणार आहेत. रैलीत भव्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक वाहनात असणार आहे. महीलांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे. विविध जिल्ह्यांतील सुमारे 12 लाख मराठा बांधव रैलीत सहभागी होणार आहेत. 12 जेसीबीच्या सहाय्याने जरांगेंचे हार घालून मराठा समाज व विविध समाजबांधव स्वागत करणार आहे. रैली शांततापूर्ण वातावरणात यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगेसोय-यांचा समावेश करावा, मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटील यांची आहे. या समारोप रैलीत सरकारने 13 जुलै पर्यंत निर्णय घेतला नाही तर पुढच्या आंदोलनाची दिशा काय असणार याबद्दल जरांगे काय बोलणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहरातील प्रवेशाच्या मार्गावर जाधवमंडी मैदान, जबिंदा ग्राऊंड, कर्णपुरा यात्रा मैदान, अयोध्या नगरी मैदान अशा विविध ठिकाणी चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मोटारसायकल पार्कींग व्यवस्था करण्यात आली आहे. रैलीत सहभागी होणाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची, फुड पाॅकीटची सुविधा उपलब्ध केली आहे. जागोजागी मोठ मोठे बॅनर असणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे आगमन.....

मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटी येथून सकाळी 11 वाजता वसंतराव नाईक चौकात आगमन होईल. लोकनेते वसंतराव नाईक यांच्या स्मारकाला हार अर्पण करून ते अभिवादन करतील. त्यानंतर अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुजन करुन पुष्पहार अर्पण करतील. रैलीत सर्वात पुढे माता भगिनी, मनोज जरांगे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक त्यांचे मागे पुरुष मंडळी, त्यानंतर 250 ट्रॅक्टरचा ताफा राहिल. रैली सिडको बसस्थानक, सेवन हिल, आकाशवाणी, मोंढा नाका, अमरप्रित चौक मार्गे उड्डाणपूल खालून राहणार आहे. रैली क्रांतीचौक आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे मनोज जरांगे पाटील पूजन करतील. संवाद साधण्यासाठी मुख्य व्यासपीठ क्रांतीचौक येथे असणार आहे. या मंचावर अगोदर शिव प्रभुंच्या प्रतिमेचे पूजन होईल. जिल्ह्यातील तालूक्यातून आलेले 11 कुमारीकांच्या हस्ते संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांचे औक्षण होईल. त्यानंतर कुमारी वैष्णवी गणेश मोटे हिच्या आवाजात जिजाऊ वंदन होईल त्यानंतर मनोज जरांगे संवाद साधतील. क्रांतीचौक मुख्य मंचावर शिवगीत गायक गणेश नरवडे व सहकारी, शाहिर गणेश गलांडे यांची शायरी सादर होईल. या रैलीत महिला सुरक्षा समिती असणार आहे. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow