चारशे पारचा नारा राज्यघटना बदलण्याचे कटकारस्थान - खासदार चंद्रकांत हंडोरे

 0
चारशे पारचा नारा राज्यघटना बदलण्याचे कटकारस्थान - खासदार चंद्रकांत हंडोरे

400 पारचा नारा राज्यघटना बदलण्याचे कटकारस्थान - खा.चंद्रकांत हंडोरे

महाविकास आघाडीच्या उमेदवारांची स्थिती मजबूत, सभेला मतदारांचा उत्सफुर्त प्रतिसाद...

औरंगाबाद, दि.21(डि-24 न्यूज) मी लातूर, नांदेड, यवतमाळ, हिंगोली लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहत असल्याने राज्यात 48 पैकी जास्तीत जास्त जागा निवडून येतील असा विश्वास पत्रकार परिषदेत काँग्रेसचे राज्यसभेचे सदस्य चंद्रकांत हंडोरे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी पुढे सांगितले आज पत्रकार भवन येथे भिमशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले मनुवादी वृत्तीच्या राज्यकर्त्यांचा संविधान बदलण्याचा डाव आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी तळागाळातील सर्व समाजाच्या तरुणांनी पुढाकार घ्यावा अशी हाक भीमशक्ती या सामाजिक संघटनेचे सर्वेसर्वा तथा खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी दिली. ते एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रविवारी शहरात आले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेले संविधान हे तळागाळातील समाजांना सन्मानाने जगण्याचे बळ देत आहे. सामाजिक न्याय, समान न्याय, हक्क, धार्मिक स्वातंत्र्य, नेमकी हीच गोष्ठ आजच्या राज्यकर्त्यांना खटकत आहे. ते आपले राज निर्विवादपणे चालवण्यासाठी स्वत:च्या मानसिकतेचे नियम येथील जनतेवर लादण्याची तयारी करत आहेत. हे करण्यासाठी त्यांना संविधान बदलायचे आहे. भाजपाच्या काही नेत्यांचे वक्तव्य सुध्दा आले आहे चारशे पार लाकसभेच्या जागा कशासाठी पाहिजे. त्या दिशेने ते कामालाही लागले आहेत. यात ते यशस्वी झाले तर येणाऱ्या काही वर्षात पूर्णपणे संविधान बदलून त्याठिकाणी आपल्या नियमांचा कायदा सर्वसामान्य समाजाला कायमचे संपवण्याचा डाव आहे. ही बाब तळागाळातील समाजासाठी घातक असल्याने आता अशा समाजातील सुजान तरुणांनी जागे व्हावे व संविधान वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही आवाहन केले.

कार्यकर्त्यांशी संवाद

दरम्यान रविवारी दुपारी हंडोरे यांनी भीमशक्तीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी पत्रकार भवन येथे संवाद साधला. भीमशक्ती ही सामाजिक संधटना संविधानाचे जतन करण्यासाठी लढत आली आणि यापुढेही लढत राहणारी संघटना असून त्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संविधानाच्या जतनासाठी सज्ज रहावे असे आवाहन केले. यावेळी दिनकर ओंकार, किशोर नरवडे, पंडितभाई नवगिरे, संतोष भिंगारे, शांतीलाल गायकवाड, विनोद कोरके, एन.के.कांबळे, अनिल मगरे, सचिन सिरसाट, मधुकर नगराळे, संजय सातपुते, भाऊसाहेब नवगिरे, कैलास जुमडे, विनोद कोरके, राजु मंजुळे, सतिश नरवडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow