संदीपान भुमरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार
संदीपान भुमरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार
औरंगाबाद, दि.21(डि-24 न्यूज) 25 एप्रिल शेवटच्या दिवशी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभुराजे देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार संजय सिरसाट यांनी दिली आहे.
त्यांनी पुढे सांगितले सकाळी 11 वाजता क्रांतीचौक येथील अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री गुलमंडी चौकात जाहीर सभेत मतदारांना संबोधित करणार आहे. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांचीही भाषण होईल. यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री उपस्थित राहतील.
What's Your Reaction?