मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांचा सत्कार सोहळा
 
                                मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांचा सत्कार सोहळा
महायुती सरकारला मतदान करण्याचे केले आवाहन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज)
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांचा भव्य सत्कार सोहळा समस्त नंदवंशी अहिर गवळी यादव समाजाच्या वतीने आज शहरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आज महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी उपस्थिती लावत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना प्रदीप जैस्वाल म्हणाले, "या निवडणुकीला मतांचे विभाजन न होऊ देता मतदान करा, आपण सर्व एकत्र राहिलो तरच सुरक्षित राहू, मध्य मतदार संघात मोठा विकास माझ्या कार्यकाळात झाला, यापुढेही विकास करण्यासाठी मला संधी द्या."
तसेच यावेळी बोलताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहनजी यादव म्हणाले, "छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान केले, त्यांचे प्राण गेले पण धर्म नाही बदलला. आपणही त्यांचा आदर्श घेऊन हिंदूत्वासाठी महायुती सरकारला मतदान करा, यांसह विविध विषयांवर यावेळी त्यांनी भाष्य केले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            