प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रदीप जैस्वाल यांची भव्य पदयात्रा

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रदीप जैस्वाल यांची भव्य पदयात्रा
घोडा, उंटानी वाढविली पदयात्रेची शान, पदयात्रेला हजारोंची उपस्थिती
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज)
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आज मध्य मतदार संघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी भव्य पदयात्रा काढली. जिल्ह्याचे ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या संस्थान गणपतीचे दर्शन घेत या पदयात्रेला सुरुवात झाली. घोडा आणि उंटानी या पदयात्रेची शान वाढवली. यावेळी हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उत्साहाने या पदयात्रेत सहभागी झाले होते.
शेवटच्या टप्प्यातील पदयात्रेला नागरिकांनी मोठा उत्साह दाखविला, ढोल-ताशांच्या गजरात, फटाके फोडत प्रदीप जैस्वाल यांचे स्वागत करण्यात आले. महिलांनी त्यांना ओवाळत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रदीप जैस्वाल यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, "मध्य मतदार संघात गेल्या अडीच वर्षात 600 कोटींच्या वर विकास कामे झाले आहेत. यात रस्ते, ड्रेनेज, पाण्याची लाईन टाकणे, महापुरुषांचे स्मारक, मंदिरासाठी सभागृह, गार्डन, यांसारख्या अनेक ठिकाणी हा निधी वापरण्यात आला. मतदार संघातील नागरिकांचे जीवन सुखकर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली, काही भागात ते चालू आहे, काही ठिकाणी बाकी आहे, आगामी काळात आपण मला संधी दिली तर याहून अधिक विकास कामे आपल्या मतदार संघात करेल, त्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करणे गरजेचे आहे. मोठ्या संख्येने मतदान करून मला निवडून आणा अशी आपल्याला विनंती करतो." यावेळी नागरिकांनी देखील प्रदीप जैस्वाल यांच्या विकास कामांवर समाधान व्यक्त करत त्यांना पाठिंबा दर्शविला.
या पदयात्रेला जगदीश सिद्ध, धीरज सिद्ध, गजेंद्र सिद्ध, विश्वनाथ राजपूत, धीरज पवार, युवराज सिद्ध, अजय पराती, कय्युम शेख, अशोक कवडे, मिल्लू चावरिया, राजेश मेहता, गोपी घोडेले, राजेश डोंगरे, सागर खत्री, निखिल चव्हाण यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थि
त होते.
What's Your Reaction?






