महाराष्ट्र व झारखंडमध्ये भाजपा मित्रपक्षांचे सरकार येईल - मुख्यमंत्री मोहन यादव
महाराष्ट्र व झारखंडमध्ये भाजपा मित्रपक्षांचे सरकार येईल - मुख्यमंत्री मोहन यादव
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारने जनहिताचे योजना राबविल्या. सर्व स्तरांना याचा लाभ झाला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशात सध्या सुरू आहे. तेथे 1250 रुपये दर महीना अकरा महीन्यात पासून दिले जात आहे. महाराष्ट्रात 1500 रुपये प्रती महीना दिला आहे. सरकार आल्यानंतर हि रक्कम वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे. लाडली बहीण योजनेचा कोट्यवधी महीलांना आर्थिक लाभ मिळाला. शेतकरी सन्मान योजनेचा लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळाला. शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जात आहे. तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येत आहे. काँग्रेस प्रचारात चुकीचे नेरेटीव्ह सेट करत आहे. या निवडणुकीत त्यांना जनता नाकारणार आहे. या राज्यातील जनता महायुती सोबत असल्याचे वातावरण आहे. महाराष्ट्र व झारखंडमध्ये भाजपा मित्रपक्षांचे सरकार येईल असा विश्वास पत्रकार परिषदेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी व्यक्त केला.
औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले हे नाव अगोदरच झाले पाहिजे होते असे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय महामंत्री अरविंद मेनन, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, दिपक ढाकणे, जालिंदर शेंडगे उपस्थित होते.
What's Your Reaction?